देशभरात लोकसभा निवडणुकांचा चौथा टप्पा आज पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह कल्याण, ठाणे आणि भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे याठिकाणी मतदान होत आहे. मुंबईत मतदान केंद्रांबाहेर गर्दी पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटीही रांगेत मतदानासाठी उभे राहिले आहेत.
फरहान अख्तरने केलं मतदान
बॉलीवू़ड अभिनेता फरहान अख्तरने मतदानाचा हक्क बजावला आहे. फरहान त्याची बहीण जोया अख्तर व आई हनी ईरानी यांच्याबरोबर मतदानासाठी गेला होता. तिघांनी मतदानानंतर पापाराझींना पोज दिल्या. त्यांचा व्हिडीओ वरिंदर चावलाने शेअर केला आहे.
अक्षय कुमारने पहिल्यांदा केलं मतदान
अभिनेता अक्षय कुमार आज पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व होतं, त्यामुळे याआधीच्या निवडणुकांमध्ये तो मतदान करू शकला नव्हता. त्याला १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय नागरिकत्व मिळाले, त्यानंतर त्याने आज लोकसभा निवडणुकांसाठी मतदान केलं.
“माझा भारत देश विकसित राहावा, मजबूत राहावा अशी माझी इच्छा आहे. हीच गोष्ट ध्यानात ठेवून मी मतदान केलं. याचप्रमाणे संपूर्ण भारताने त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवारासाठी मतदान करावं,” असं अक्षय कुमार म्हणाला. पहिल्यांदा मतदान करून खूप चांगलं वाटत आहे, असंही अक्षयने नमूद केलं.
“मी सकाळी सात वाजता इथे आलो तेव्हापासून ५००- ६०० लोकांना इथे मतदानासाठी आल्याचं मी पाहिलं आहे. लोक मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत,” असं अक्षयने म्हटलं.
ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos
शोभा खोटे यांनी केलं मतदान
ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी लोकसभा निवडणूक २०२४ साटी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. “मी योग्य उमेदवाराला मतदान केले आहे. मी घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडला नाही आणि इथे मतदान केंद्रावर येऊन मत दिलं, जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे,” असं शोभा खोटे म्हणाल्या.
इतर सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
या सेलिब्रिटींशिवाय जान्हवी कपूर व सान्या मल्होत्रा यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतं दिली. अभिनेता राजकुमार रावनेही मतदानाचा हक्क बजावला आहे. या सेलिब्रिटींचे मतदान केंद्रांवरील फोटो व व्हिडीओ चर्चेत आहेत.