Nag Panchami 2025 Wishes In Marathi : श्रावणातील सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या सणापासून श्रावणातील सर्व सणांना सुरुवात होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी सणाचा उत्साह पाहायला मिळतो. नागपंचमीला नागदेवतासह भगवान शंकराची मनोभावे पूज केली जाते. नाग या प्राण्याविषयी प्रेम, काळजी आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
नागपंचमीच्या सणानिमित्त तुम्ही प्रियजणांना खास मराठीत शुभेच्छा संदेश पाठवू शकता. यासाठी आम्ही नागपंचमीचे (Nag Panchami 2025) खास १० Messages, Wishes, Whatsapp Status घेऊन आलोत जे तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि प्रियजनांना शेअर करू शकता.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! (Nag Panchami shubhechha wishes In Marathi)
दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला..
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा…!
रक्षण करू या नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी सुख समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुंधरा, घेतला हाती हिरवा शेला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी
आज श्रावण सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमी भक्तांसाठी उत्सव भारी
नागदेवता बळीराजाचा आहे कैवारी
नागदेवतांची पूजा करावी मनोभावी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

नागपंचमीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा (Nag Panchami Status, Quotes, Messages In Marathi)
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र,
पाठ राखीतो बळीराजाची.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नागपंचमीचा मनापासून शुभेच्छा तुम्हाला
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करू या
नागपंचमीच्या दिवशी निसर्गाचे जतन करू या
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागोबाचे रक्षण करू, हीच खरी नागपंचमी..
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी,
तुमचे आयुष्य मंगलदायी असावे..
नागपंचमीच्या शुभेच्छा!