सणासुदीच्या दिवसात जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले आहे का? तर ‘या’ पद्धतीने करा डिटॉक्स

डिटॉक्स प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही केवळ तुमची पचन क्रिया ठीक करू शकत नाही, तर शरीराचे पीएच लेवल देखील चांगले ठेवू शकता.

lifestyle
आल्यामध्ये जिंजरॉल असते जे पोटाच्या समस्या टाळण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी ओळखले जाते.(photo: pixabay)

प्रत्येकजण आरोग्याबाबत जागरूक राहत असतात आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतच असतो. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात उच्च कॅलरी खाद्यपदार्थ खाल्याने तुम्हाला तणाव निर्माण झाला असेल. त्यात तुम्ही या उत्सवाच्या दिवसात हेवी डिनर केले असेलच. तर याकरिता तुमच्या शरीराला हलके करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्सच्या मदतीने डिटॉक्स करू शकता आणि पुन्हा हलके वाटू शकता. चला तर मग डिटॉक्स ड्रिंक्सचे फायदे जाणून घेऊयात.

डिटॉक्स ड्रिंकचे फायदे

डिटॉक्स प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही केवळ तुमची पचन क्रिया ठीक करू शकत नाही, तर शरीराचे पीएच लेवल देखील चांगले ठेवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. खरं तर तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न, जंक फूड इत्यादींचा तुमच्या पचनावर खूप परिणाम होतो आणि ते कमकुवत होते. यामुळे पोट खूप जड राहते आणि कधी कधी दोन-तीन दिवस अस्वस्थही होते. अशा परिस्थितीत, तुम्ही डिटॉक्सिंग करून आणि तुमच्या शरीरातील चयापचय वाढवून पुन्हा निरोगी होऊ शकता.

या सोप्या पद्धतीने बॉडी डिटॉक्स करा

लिंबू व आले डिटॉक्स ड्रिंक्स

एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि त्यात एक इंच आले बारीक करून घाला. त्यानंतर हे ड्रिंक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि रोज सकाळी प्या. आल्यामध्ये जिंजरॉल असते जे पोटाच्या समस्या टाळण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी ओळखले जाते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

काकडी व पुदिना डिटॉक्स ड्रिंक्स

थंड पाण्यात काकडीचे पातळ काप टाका आणि त्यात पुदिन्याची पाने घाला. रात्रभर फ्रीजमध्ये हे ड्रिंक ठेवा आणि सकाळी प्या. तुम्ही ते दिवसभर देखील पिऊ शकता. याच्या वापराने तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये सहज निघून जातात.

संत्री, गाजर आणि आले डिटॉक्स ड्रिंक्स

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात तर गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि फायबर असतात जे वजन कमी करण्यास आणि पचन करण्यास मदत करतात. आले पचन, सूज, पोटदुखी बरे करण्यास मदत करते. हे करण्यासाठी गाजर आणि संत्रा मिक्सरमध्ये बारीक करून रस काढा आणि त्यात आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या. किंवा तुम्ही यात आल्याचा रस घालूनही पिऊ शकता.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना तुम्ही क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Have you eaten too much oily and spicy food on festive days so detox the body in this way scsm

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या