आयुर्वेदातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणून मुळा या भाजीकडे पाहिलं जातं. मात्र हे फार कमी जणांना माहित आहे. रंगाने पांढरा शुभ्र पण चवीने थोडासा कडवट असलेला मुळा हा एक कंदमुळ प्रकारात मोडतो. विशेष म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध होणारा मुळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. विशेष म्हणजे हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात मुळा खाण्याचे फायदे –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मुळाचं सेवन करणं फायदेशीर आहे.

२. मुळा खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३. मूळव्याधीचा त्रास कमी करण्यास मुळा फायदेशीर आहे.

४. मुळ्यामध्ये असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, जस्त (झिंक) व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात.

५. मूत्राशयासंबंधी समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो.

६. मुळा खाल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

७. मुळ्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

८. कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश करावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of eating radish ssj
First published on: 11-09-2020 at 15:43 IST