‘ईचक दाना, बिचक दाना दाने ऊपर दाना, ईचक दाना’ डाळिंबाचं वर्णन करणारं हे गाणं आपल्या तोंडात चांगलंच बसलं आहे. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्घंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्घंधी निघून जाते.
– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benifits of pomegranate in marathi
First published on: 31-10-2017 at 10:48 IST