Applying Castor Oil On Belly Button: नाभी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीराच्या इतर भागांप्रमाणे नाभी स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की नाभीमध्ये एरंडेल तेल लावल्याने तुम्ही अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. होय, तसं तुम्ही मोहरीचे तेल, खोबरेल, तिळाचे तेल तसेच इतर अनेक तेल नाभीवर लावण्याचे फायदे ऐकले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की नाभीवर एरंडेल तेल लावल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. तुमच्या नाभीत तेल लावण्याचे फायदे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाभीमध्ये एरंडेल तेल लावल्याने फायदा होतो

पोटासाठी फायदेशीर
आपल्यापैकी बहुतेकांना दररोज पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत नाभीवर एरंडेल तेल लावल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटात गॅस आणि पोटदुखी यासारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. नाभीवर एरंडेल तेल लावल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.

आणखी वाचा : तळपायाला घाम येतोय? वेळीच काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार

मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करते
मासिक पाळीत महिलांना तीव्र वेदना किंवा पेटके येतात. त्यामुळे त्यांना दिवसभरातील सामान्य कामे करणे कठीण होते. नाभीवर एरंडेल तेल लावणे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

संसर्गाचा धोका कमी होतो
आपल्यापैकी बरेच जण नियमितपणे आपल्या शरीराच्या इतर भागांची साफसफाई करतात. परंतु नाभीच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत, तर नाभी स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही दररोज रात्री नाभीवर एरंडेल तेल लावू शकता.

त्वचेसाठी फायदेशीर
नाभीवर पेस्ट लावणे तुमच्या त्वचेसाठी आणि ओठांसाठीही खूप फायदेशीर आहे. नाभीवर एरंडेल तेल लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या जसे की मुरुम, ऍलर्जी आणि डाग दूर होतात. याशिवाय ओठ फाटण्यापासून बचाव होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips benefits of castor oil applying in the navel prp
First published on: 06-06-2022 at 20:54 IST