डॉ. जाह्नवी केदारे
Health Special: ‘अनुप आता १० वर्षांचा झाला, तरी बऱ्याच वेळा रात्री अंथरूणात शू करतो. किती वेळा त्याला ओरडले, अगदी दोन फटके दिले तरी काही उपयोग होत नाही. किती वेळा त्याला समजावले की तू मोठा झालास आता, असे नाही करायचे!’ मलाही समजते की तो मुद्दाम नाही करत; काय करायचे आता?’

“डॉक्टर, गेल्या महिन्यात दोन वेळा साहिलला शाळेतून घरी पाठवले. खेळाच्या तासाच्या वेळेस त्याला कपड्यातच शू होऊन गेली. असे आधी कधी झालेले नाही. आता तो दुसरीत आहे, पण तीन वर्षांचा असल्यापासून असे कधी झाले नाही. मला काळजी वाटली, म्हणून लगेच तुमच्याकडे आले.” अनुपला लहानपणापासून रात्री अंथरूणात शू होते आणि दहा वर्षांचा झाला तरी ते थांबलेले नाही. या उलट साहिलला तीन वर्षांचा झाल्यावर असे कधीच व्हायचे नाही आणि आता नव्याने हा त्रास सुरू झाला आहे. दोघांचीही तक्रार एकाच प्रकारची होती- ‘नकळत होऊन जाणे(Enuresis). अनुपला हे रात्री होते (nocturnal- at night), तर साहिलला दिवसा (diurnal- during daytime). काही मुलांना हा त्रास दिवसभरात किंवा रात्री कधीही होऊ शकतो (both nocturnal and diurnal).

how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…
are you always in a stress due to workload
Work Stress : तुम्ही कामाचा सतत ताण घेता का? कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे
argument in the relationship between brothers and sisters
भावा बहिणीचं नातंही ताणलं जातंय?
schizoid personality disorder chaturang article
स्वभाव – विभाग : अलिप्त मी!
microwave has bacteria
मायक्रोवेव्ह म्हणजे बॅक्टेरियाचे घर? रक्तप्रवाहात शिरल्यास गंभीर आजारांचा धोका? आरोग्यासाठी किती घातक?
grandmother, illness, fear, chemotherapy, school, family, courage, support, childhood,
सांदीत सापडलेले: आजारपण!

हेही वाचा >>> Health Special: दुर्लक्षित पण महत्त्वाचा आजार ‘स्क्रब टायफस’ आहे तरी काय? उपचार काय कराल? 

मुलांची वाढ होताना साधारण दोन अडीच वर्षांची मुले झाली की आई-वडील आणि घरातली इतर मोठी मंडळी ‘शू लागली का? चला शू करायला.’ असे हळू हळू प्रशिक्षण सुरू करतात(toilet training) आणि साधारण तीन-साडेतीन वर्षांपर्यंत बहुतांश मुले शू लागली कीसांगणे, आपण होऊन शू करायला जाणे असे शिकू लागतात. पाच वर्षांपर्यंत मुले शू-शी कधी आणि कुठे करायची हे शिकली तर ते नॉर्मल समजले जाते. पाच वर्षांनंतर जर मुलाचे शू (लघवी) वर नियंत्रण नसेल, तर तो एक प्रकारचा आजार (Enuresis) मानला जातो आणि त्याच्यावर उपचार करावे लागतात. हा त्रास बऱ्याच मुलांमध्ये असतो.

पाच वर्षांच्या ५-१०% मुलांमध्ये आपल्या लघवीवर नियंत्रण नसते. ८-१० वयापर्यंत १.५-५% मुलांमध्ये हे नियंत्रण निर्माण होत नाही, तर १५ वर्षे वयाच्या १% मुलांना हे  नियंत्रण नसते. मुलांमध्ये मुलींच्यापेक्षा जवळजवळ दीडपट प्रमाण दिसून येते. काही कुटुंबांमध्ये हा त्रास दिसून येतो. Enuresis चे निदान करण्याआधी इतर कोणता मूत्रपिंडाचा किंवा मूत्राशयाचा आजार नाही ना, urine infection नाही ना किंवा फिट्स, इतर काही चेतसंस्थेचा आजार नाही ना ह्याची खात्री करावी लागते. बहुतेकदा लक्षणांची व्यवस्थित माहिती घेतली तर बाकी आजार नाहीत हे सूचित होते आणि आवश्यक वाटले तरच तपासण्या कराव्या लागतात.

हेही वाचा >>> हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?

आनुवांशिकतेबरोबरच इतरही कारणे Enuresisला जबाबदार असतात. मुलांना जेव्हा लघवीवरचे नियंत्रण शिकवले जाते, तेव्हा काही मुले आपल्याला लागलेली शू रोखून धरू लागतात. साठलेली लघवी मावेल एवढे मूत्राशयचे स्नायू प्रसरण पावतात. दिवसभर असे घडते आणि विशेषतः रात्री झोपेत मूत्राशयचे स्नायू शिथील होतात आणि लघवी होऊन जाते. अशा प्रकारे चुकीच्या सवयींमुळे enuresis सुरू होऊ शकतो. मेंदू आणि चेतारज्जू यांची वाढ(neurodevelopment), बुद्धीचा विकास(cognitive development) यांमध्ये बाधा निर्माण झाली तर enuresis होतो. त्या बरोबरच आजूबाजूचे वातावरण, भीती, लहान भावंड जन्माला आल्यानंतर असुरक्षित वाटणे, अशा अनेक भावनिक घटकांमुळेसुद्धा एकदा प्राप्त झालेले नियंत्रण नाहीसे होऊन नव्याने enuresis होतो. साहिलच्या बाबतीत तेच घडलेले दिसते. Enuresis वर उपचार करताना या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करून निदान केले जाते आणि आनुवांशिकता आणि वातावरण यांचा विचार करून उपाय योजना केली जाते.

मुलाला कधीच आपल्या मूत्राशयच्या स्नायूंवर नियंत्रण करता आलेले नाही, त्यांच्यामध्ये इतर शारीरिक आजार नाहीत ना याची खात्री करून घ्यावी लागते. ‘जाईल आपोआप’ असे न म्हणता डॉक्टरकडे नेणे महत्त्वाचे. उपचार दोन प्रकारे केले जातात. औषधोपचार, ज्याचा चांगला उपयोग होतो आणि वर्तणूक उपचार (behaviour therapy). संध्याकाळी द्रव्य पदार्थांचे सेवन मर्यादित करणे. उदा. जेवताना २-४ पेले पाणी न पिऊ देणे, किंवा संध्याकाळी चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक आशा गोष्टींवर मर्यादा घालणे, रात्री झोपण्याआधी शू करण्याची सवय लावणे, विशिष्ट वेळेला गजर लावून त्या वेळेस उठून मध्यरात्री शू करायला शिकवणे असे काही सोपे उपाय करता येतात. मुलांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करणे, त्यांना शाबासकी, बक्षीस देणे याने लागलेली सवय पक्की व्हायला मदत होते. बॅटरीवर चालणारे एक उपकरणही उपलब्ध असते. अंथरूण ओले व्हायला लागले की यातून गजर वाजतो आणि मुलाला जाग येते आणि तो शू करायला उठून जाऊ शकतो. भावनिक संघर्ष आहे असे लक्षात आले, तर मानसोपचारचा (psychotherapy) चांगला उपयोग होतो. आपल्याला इतर मुलांसारखे आपल्या शूवर नियंत्रण नाही याचा मुलांना फार त्रास होतो, आत्मविश्वास कमी होतो, प्रतिमा चांगली राहात नाही आणि स्वाभिमान निर्माण होत नाही. आपला मुलगा किंवा मुलगी मुद्दाम असे वागत नाही हे ध्यानात घेऊन त्याला आधार देत, समजून घेत आणि प्रोत्साहन देत आपल्या मुलाला बरे केले पाहिजे.