सध्याचा उन्हाळा फार कडक आहे, जाचा परिणाम एखाद्याच्या आरोग्यावर होऊ शकतो. उष्णतेच्या लाटेमुळे एखाद्याला निर्जलीकरण, सनस्ट्रोक किंवा डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यावर सोपे उपाय शोधताना एका इन्साग्राम पेजवर, उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण होणारी डोकेदुखी कलिंगडाचा रस प्यायल्याने बरी होऊ शकते, अशी पोस्ट पाहिली. ज्यात ‘प्रत्येक दिवसाला एक ग्लास कलिंगडाचा रस कमाल करू शकतो,’ असे कॅप्शन देऊन ही पोस्ट be_natural_302 by Nidhi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण हे सत्य आहे का? हे जाणून घेताना मुंबईच्या ‘अपोलो स्पेक्ट्रा’ येथील आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “निर्जलीकरण होणे, म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, हे डोकेदुखी होण्यामागचे सामान्य कारण आहे. त्यामुळे पाणी पिणे किंवा भरपूर पाण्याचे प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन करून डोकेदुखी टाळता येते किंवा निर्जलीकरणामुळे होणारी डोकेदुखी कमी करता येते. तसेच कलिंगडामध्ये अमिनो अॅसिड सिट्रुललाइन असते, जे रक्तवाहिन्यांना शिथिल करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. पर्यायाने संभाव्य डोकेदुखीची तीव्रता कमी करण्यासाठी मदत करते.

कलिंगडाचा रस डोकेदुखीवर उपयोगी ठरतो का?

कलिंगडाचा रस हा सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर उपाय नसला तरी, तो नक्कीच तुम्हाला ताजेतवाने आणि पाण्याची कमतरता पूर्ण करणारा पदार्थ असू शकतो जो निर्जलीकरणाने होणारी डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकतो,”असे अन्सारी यांनी पुढे स्पष्ट केले.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कलिंगडाचा रस तुम्हाला दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा देतो, तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यास आणि तिचा ओलावा टिकविण्यास मदत करतो. त्यातील पोटॅशिअम तुमच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासदेखील मदत करते आणि तुमच्या त्वचा आणि केसांचे आरोग्य जपण्यास मदत करते, असेही अन्सारी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा – तुम्हाला मध्यरात्री भुक लागते का? मग, पोषणतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ पाच हेल्दी पदार्थ खा

अन्सारी यांनी कलिंगडाच्या रसामधील आणखी काही फायदेशीर घटकांबाबत माहिती दिली.

  • कलिंगडामध्ये पोषक तत्त्वांनी युक्त ९० टक्के पाणी असते.
  • कलिंगडाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी-६ उपलब्ध असते
  • कलिंगडामध्ये अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि लायपोसीन मुबलक प्रमाणात असतात
  • कलिंगडामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते
  • त्यामध्ये मीठ आणि कॅलरी कमी असतात

    हेही वाचा – Diet tips : तुमच्या यकृताची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

तज्ज्ञ सुचवतात की, कलिंगडाचा रस पिण्याऐवजी, तुम्ही फळदेखील घेऊ शकता.
‘झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल’च्या अंतर्गत औषधतज्ज्ञ, डॉ. उर्वी माहेश्वरी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, एक कप कलिंगडाच्या रसामध्ये अर्धा कप पाण्यासह काही प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन ए आणि मॅग्नेशिअमसह महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एका कपामध्ये फक्त ४६ कॅलरीज असतात. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कलिंगडामध्ये अत्यंत कमी कलॅरीजची घनता असते. म्हणजे कलिंगडाच्या बहुतांश भागात कमी कॅलरीज असतात.

अन्सारी यांनी अशा आहाराबाबतदेखील सांगितले ज्यामध्ये कमी कॅलरीजची घनता आणि ज्यामध्ये पोट भरल्याची भावना वाढते आणि भूक कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. “तसेच कलिंगड हे लायकोपीनसह शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. या कम्पाऊंडचा पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्याच्या क्षमतेसाठी अभ्यास केला गेला आहे, ज्याचा संबंध हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांशी आहे,” अन्सारी म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can a glass of watermelon juice help cure headaches caused by summer heat know expert opinion snk
First published on: 15-05-2023 at 12:13 IST