Egg Consumption and Diabetes : अंडी ही आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. प्रोटिन्सचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंड्यांचा समावेश केला जातो. अंड्यांपासून तुम्ही आवडेल ते विविध पदार्थ बनवू शकता. विशेषत: अंड्यामध्ये असलेला पिवळा भाग मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार असलेले लोक खाणे टाळतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी अंडी फायदेशीर आहेत का, याविषयी मॅक्स हेल्थ केअरच्या एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीजचे प्रमुख डॉ. अंबरीश मिथल यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

मधुमेहाच्या लोकांवर प्रोटिनचा कसा परिणाम होतो?

जेव्हा तुम्ही प्रोटिन्सबरोबर कर्बोदके खाता तेव्हा कर्बोदकाचे ग्लुकोजमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागू शकतो, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जेवण केल्यानंतर रक्ताची पातळी कमी होते.

एक ग्रॅम प्रोटीन तुम्हाला चार कॅलरीज देत असतात. कर्बोदकाप्रमाणेच प्रोटीनसुद्धा लवकर तृप्त करून कॅलरीज कमी करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आहारात प्रोटीनची मात्रा कमी असेल तर स्नायू कमवकुवत होतात, त्यामुळे उतार वयात मधुमेहाच्या रुणांना त्रास होतो. कमकुवत स्नायू फॅटी लिव्हर होण्यास कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे लिव्हर सिरोसिस आणि कर्करोगदेखील होऊ शकतो.

हेही वाचा : तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

अंड्यातील पोषक घटक जाणून घ्या

एका मध्यम आकाराच्या अंड्या (जवळपास ५८ ग्रॅम) मध्ये ६६ कॅलरीज, सहा ग्रॅम प्रोटीन आणि ४.६ ग्रॅम फॅट्स असतात. २० टक्क्यांहून अधिक सॅच्युरेटेड फॅट्स असतात. अंड्यांमध्ये खूप कमी कर्बोदके असतात. याशिवाय त्यात जीवनसत्त्वे बी २, जीवनसत्त्वे बी १२ आणि फोलेट, बायोटिन, पॅन्टोथेनिक अॅसिड आणि कोलिनसारखे जीवनसत्त्वे बी असतात. त्यात फॉस्फरस, आयोडिन आणि सेलेनियमसह इतर आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे ए आणि थोड्या प्रमाणात जीवनसत्त्वे डीसु्द्धा असतात.

अंड्याच्या पांढऱ्या आणि पिवळ्या भागात वेगवेगळे पौष्टिक घटक असतात. अंड्यातील पिवळ्या भागापेक्षा अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये जास्त प्रोटीन असते. अंड्यातील पिवळ्या भागामध्ये भरपूर फॅट्स असतात, ज्यामुळे पांढऱ्या भागापेक्षा पिवळा भाग कमीत कमी तीन पट जास्त कॅलरी बनवतात, पण पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात.

अंड्यातून सर्वात जास्त मिळणारा घटक म्हणजे प्रोटीन. नाश्त्यामध्ये दोन मध्यम आकाराची अंडी खाल्ल्याने तुम्हाला १२ ग्रॅम प्रोटीन मिळू शकतात. त्यामुळे अंडी खाऊन दिवसाची सुरुवात करणे कधीही चांगले आहे.
ICMR (इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च) नुसार, प्रौढ व्यक्तींनी शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीन खावेत. भारतीय अनेकदा दिवसाला ०.६ ग्रॅमसुद्धा प्रोटीन विकत घेत नाही.

मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज प्रोटीनच्या माध्यमातून १५ ते २० टक्के कॅलरीचे सेवन करणे आवश्यक आहे. याचबरोबर नियमित व्यायाम करणारे आणि जे खेळाडू असतील त्यांनी जास्त प्रमाणात प्रोटिनचे सेवन करावे. अंड्यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. दोन मोठ्या अंड्यांमध्ये फक्त एक ग्रॅम कर्बोदके मिळतात.

अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते?

अंड आरोग्यासाठी चांगले आहे का नाही, हा वाद अंड्यातील पिवळ्या भागातील कोलेस्ट्रॉलमुळे निर्माण होतो. एका अंड्यामध्ये २०० मिलिग्रॅम (mg) पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल असतात, त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि आपल्याला हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. एका संशोधनात असेही दिसून आले आहे की, आहारातील कोलेस्ट्रॉलच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. म्हणजेच अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. DIABEGG अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दर आठवड्याला १२ अंडी खाल्ल्याने टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, ग्लुकोज किंवा इन्सुलिनच्या पातळीवर कोणताही चुकीचा परिणाम होत नाही.

अंडी मधुमेह असलेल्या लोकांच्या आहारात एक पौष्टिक घटक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. अंडी रक्तातील साखर किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यावर परिणाम होऊ न देता शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि आवश्यक पोषक घटक पुरवतात आणि स्नायूंचे आरोग्य सुधारते