गेल्या काही वर्षांमध्ये ग्लुटेन फ्री आहार म्हणजे ग्लुटेन नसलेल्या आहाराची क्रेझ वाढत आहे. काही लोक ग्लुटेन फ्री आहार पचन समस्यांवर फायदेशीर असल्याचा दावा करत आहेत. आहारतज्ज्ञ गरिमा गोय यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले की, “तुम्हाला जर गॅस किंवा ब्लोटिंग म्हणजेच खाल्ल्यानंतर तुमचं पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करावा लागेल. फक्त ग्लुटेनयुक्त आहाराचे सेवन टाळा.”

“गव्हाच्या पोळ्या, मैदा, रवा आणि उपमा यांसारख्या पदार्थांमध्ये ग्लुटेन आढळते, हे अधोरेखित करून त्याचे सेवन टाळावे आणि काही फरक जाणवतो आहे का पहावे?”असे गोयल यांनी सुचवले. ग्लुटेन फ्री आहार टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आधी तीन दिवस सामान्य आहाराचे सेवन करा आणि झोपताना हृदयाची गती तपासा. त्याची नोंद ठेवा आणि नंतर तीन दिवसांनी ग्लुटेन फ्री आहार घेण्यास सुरुवात करा. ग्लुटेन फ्री आहार सुरू केल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी तपासाव्या लागतील. विश्रांती घेताना हृदयाची गती आणि गॅस आणि ब्लोटिंग या समस्या कमी होत आहे की नाही ते तपासा”, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

गोयल यांनी २० दिवस ग्लुटेन फ्री आहार घेऊन काही फरक जाणवतो का हे जाणून घेण्याची शिफारस केली आहे. ग्लुटेन फ्री आहाराचे सेवन टाळावे की नाही, याबाबत शंका असेल तर तुम्ही फुड इंटॉलरन्स टेस्ट (food intolerance test) किंवा जनुक चाचणी (a gene test) घेऊ शकता, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – तुम्हाला चहा-कॉफीचे व्यसन आहे का? शरीरावर होणारे वाईट परिणाम, जाणून घ्या 

ग्लुटेनयुक्त आहाराचा पचनासंबंधित आरोग्य समस्यांवर काही परिणाम होतो का? या दाव्याची पडताळणी करण्यासाठी
तज्ज्ञांशी संवाद साधला. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना नोएडा येथील मदरहूड हॉस्पिटल्समधील सल्लागार आहारतज्ज्ञ-पोषणतज्ज्ञ निव्या विक यांनी सांगितले की, आहारातून ग्लुटेन काढून टाकल्याने सेलिआक रोग (celiac disease) किंवा नॉन-सेलिआक ग्लुटेन (non-celiac gluten sensitivity) संवेदनशीलता असलेल्या लोकांना मदत होऊ शकते; कारण यामुळे सूज येणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारखी पाचक लक्षणे दिसू शकतात. पण, ग्लुटेन फ्री आहार आरोग्य सुधारू शकते किंवा सेलिआक रोग किंवा ग्लुटेन संवेदनशीलता नसलेल्या व्यक्तींना होणारा आजार टाळेल असा कोणताही पुरावा नाही.”

ग्लुटेन फ्री आहाराचे सेवन करण्याचा फायदा मुख्यतः सेलिआक रोग किंवा नॉन-सेलिआक ग्लुटेन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी आहेत, कारण ते पचनासंबंधित समस्यांची लक्षणे कमी करण्यास, जळजळ किंवा सूज कमी करण्यास आणि ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करू शकतात”, असे विक यांनी स्पष्ट केले. हाशिमोटोस् थायरॉइडायटिस (Hashimoto’s Thyroiditis ) किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कंडिशन (Gastrointestinal Conditions) सारखे काही विशिष्ट ऑटोइम्यून आजार असलेल्या काही लोकांसाठी ग्लुटेन फ्री आहाराचे पालन केल्याने होणाऱ्या त्रासाची लक्षणे कमी होऊ शकतात.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती देताना, अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, ग्लुटेन संवदेनशील नसलेल्या लोकांसाठी ग्लुटेन फ्री आहाराचे सेवन केल्याचे फायदे कमी स्पष्ट आहेत. “ग्लुटेन फ्री आहाराचे सेवन केल्याबाबत समर्थक दावा करतात की, त्यामुळे ऊर्जा वाढू शकते, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (पाचक समस्या) आरोग्य सुधारू शकते, वजन कमी करण्यास मदत होते आणि सूज किंवा जळजळ कमी होते. पण, या दाव्याला समर्थन देण्यासाठी बरेच कठोर अभ्यास किंवा संशोधन अद्याप झालेले नाही. ”

डॉ. रोहतगी यांच्या मते, एक फायदा असा आहे की, “ग्लुटेन फ्री आहार टाळणारे लोक अधिक परिपूर्ण, प्रक्रिया न केलेले आहाराचे सेवन करतात; ज्यामुळे आहारातील पौष्टिकतेचे प्रमाण वाढू शकते.”

हेही वाचा –मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे

ग्लुटेनयुक्त आहाराला पर्याय काय आहे? (What are the alternatives to gluten?)
जे लोक ग्लुटेनयुक्त आहार टाळत आहेत त्यांना विविध पौष्टिक आहाराचे पर्याय मिळू शकतात. ही यादी पाहा
धान्य : क्विनोआ (Quinoa), तांदूळ, मका (कॉर्न), बाजरी, ज्वारी, बकव्हीट (buckwheat) , राजगिरा आणि टेफ (teff)
पीठ : बदामाचे पीठ, नारळाचे पीठ, तांदळाचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, बटाट्याचे पीठ आणि चण्याचे पीठ.
स्टार्च : आरारूट, साबुदाणा आणि बटाटा

याव्यतिरिक्त “आहारातील विविध पाककृतींसाठी पर्यायी पदार्थांचा वापर करू शकता आणि पोषणमूल्य आणखी वाढवू शकता”, असे रोहतगी यांनी सांगितले.