Hair care: जगातील अनेक महिलांना आणि पुरुषांना केस गळतीची समस्या सतावत असून ही समस्या हल्ली दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही अनेक हेअरकेअरचे व्हिडीओ पाहायला मिळतात. आपले केस मजबूत आणि सुंदर दिसावे यासाठी अनेक जण सोशल मीडियावरील टिप्स फॉलो करत आहेत. तुमचा टाळू स्वच्छ करणे असो, मॉइश्चरायझिंग मास्क वापरणे असो किंवा तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी तुमच्या केसांना प्रशिक्षण देणे असो, तुमच्या केसांना काही मार्गदर्शक सल्ल्याची गरज असते.

उष्ण, दमट महिन्यात तुमचे केस किती वेळा स्वच्छ करावेत? याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस.कॉम’ने एका तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.

डॉ. शरीफा चाऊस, शरीफाच्या स्किन केअर क्लिनिकमधील त्वचाविज्ञानी आणि कॉस्मेटोलॉजिस्ट यांनी सांगितले की, “तुम्ही तुमचे केस आठवड्यातून तीन वेळा धुवा किंवा एक दिवस सोडून धुवा. जर तुमच्या टाळूमध्ये जास्त प्रमाणात सीबम तयार होत असेल, तर तुम्हाला केस अधिक वेळा धुण्याची आवश्यकता असते.”

चाऊस म्हणाले की, “केसांची वाढ प्रामुख्याने पौष्टिक घटकांवर अवलंबून असते आणि म्हणूनच केस धुण्याची वारंवारता क्वचितच लागू होऊ शकते”. तथापि, त्या दररोज केस धुण्याचा सल्ला देत नाहीत.

केस जास्त वेळा कधी धुवावे? (Hair care)

डॉ. शरीफा चाऊस म्हणाल्या की, “कोंडा आणि seborrheic dermatitis ग्रस्त लोकांसाठी, केस गळती अनेकदा केस कुरळे असल्यामुळे होते. टाळूवरील घामाच्या ग्रंथी जास्त प्रमाणात सीबम तयार करतात, त्यामुळे टाळूला वारंवार धुवून स्वच्छ ठेवणे हे केस गळणे रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.”

तेलकट टाळू आणि केस लांब असलेल्या लोकांसाठी, टाळूच्या भागात हायड्रेशन संतुलित करणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात, उष्ण आणि कोरड्या हवेमुळे टाळू अधिक सीबम स्राव करू शकते. “कॉम्बिनेशन हेअर असलेल्या लोकांना केस सतत धुवावे लागतात, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की, यामुळे त्यांची टाळू कोरडी पडते. केस सतत धुतल्याने डोक्याच्या काही भागांत असलेले तेल टोकापर्यंत पोहोचत नाही”, असे चाऊस म्हणाल्या.

हेही वाचा : मेरी कोमने पोलंडमधील स्पर्धेदरम्यान चार तासांत केले दोन किलो वजन कमी! खरंच व्यायाम केल्याने काही तासांत वजन कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. शरीफा चाऊस यांनी टाळू स्वच्छ करण्यासाठी केमिकल आणि सल्फेटमुक्त सौम्य फॉर्म्युलेशन आणि केसांच्या लांबीसाठी हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच केस दररोज धुण्याऐवजी आठवड्यातून काही पर्यायी दिवशी धुण्याचा सल्ला दिला आहे.