“तो आधी असा नव्हता. फोन आणि सोशल मीडिया वापरायला लागल्यापासून खूप बदलला आहे. सारखी चिडचिड. काही सांगत नाही. स्वतःच्या खोलीत असतो नेहमी. कळत नाही काय करावं?”
एक आई.

तिचं काय सुरु आहे समजत नाही. अभ्यास करते. मार्कही मिळवते, पण सतत फोनमध्ये असते. कुणाशी बोलणं नाही. नातेवाईकांच्या कार्यक्रमाला ये म्हटलं तर येत नाही. सारखी ऑनलाईन भांडणं होत असतात. मग सतत चिडचिड. धुसफूस. विचारलं तर सांगत नाही.”
एक बाबा.

Amar Singh Chamkila show fee
८० च्या दशकात एका शोसाठी किती मानधन घ्यायचे अमरसिंग चमकीला? रक्कम ऐकून चकित व्हाल
a woman met her friend after 15 years emotional moment
Video : तब्बल १५ वर्षानंतर भेटली मैत्रीणीला! पाहा तो सुंदर क्षण, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे मित्र- मैत्रीणी
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”

आणखी वाचा: Mental Health Special: आपलं मूल वयाच्या कितव्या वर्षी इन्स्टाग्रामवर येतंय?

लॉक डाऊनमध्ये टीनएजर झालेल्या किंवा प्री टीन्समध्ये शिरलेल्या मुलामुलींच्या आईबाबांकडून या आणि अशा स्वरूपाच्या तक्ररी वरचेवर ऐकायला मिळतायेत. यातली बहुतेक मुलं लहानपणापासून टीव्ही किंवा मोबाईलबरोबर वाढलेली असतात. त्यांचे स्वतःचे स्वतंत्र फोन त्यांना लॉकडाऊनमध्ये मिळाले असले तर यातले बहुतेक जण अगदी तान्हे असल्यापासून टीव्हीवर किंवा मोबाईलवर कार्टून्स, बडबड गीतं किंवा लहान मुलांची गाणी/सिनेमे/ गोष्टी बघत जेवणारी असतात. आईबाबांच्या कामाच्या वेळात आपल्याला टीव्ही आणि मोबाईल हमखास मिळतो हे माहित झालेली आणि प्रसंगी मोबाईल/टीव्ही बघायला मिळवा म्हणून आईबाबांना कसं गुंडाळायचं या कलेत प्राविण्य मिळवलेली असतात.

आणखी वाचा: Mental health Special: …असं वाटणारी ‘ती’ एकटीच नाहीए!

आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया. ज्या मुलांना वयाच्या तीन चार महिन्यांपासून कुठल्या ना कुठल्या स्क्रीनवर काही ना काही बघायची सवय लागलेली आहे अशी मुलं जेव्हा जेव्हा टीनएजर होतात तेव्हा त्यांचं वर्तन अचानक बदलू शकेल का? नाही. पण पालक म्हणून आपण आपल्याच मुलांकडे वेगवेगळ्या नजरेनं बघायला अचानक सुरुवात करतो आणि संघर्ष वाढायला लागतो. कालपर्यंत आपल्याला भरपूर टीव्ही बघू देणारे, कधीही मोबाईल मागितला तरी तोही देणारे आईबाबा अचानक या सगळ्याला धरून इतके का बोलायला लागले आहेत हे त्या मुलांना समजत नाही, कालपर्यंत हे सगळं चालत होतं पण आज अचानक यावर बंधन आणण्याची गोष्ट आईबाबा का करतात हेही त्यांना समजत नाही आणि फोन ठेवून दे असं म्हटलं की ती चिडतात. रागावतात. रुसतात. प्रसंगी त्यांच्याही अपेक्षेपेक्षा जास्त हिंसक बनतात.

आईबाबा आपल्या अपेक्षा आता का बदलता आहेत हे नीट पद्धतीने मुलांपर्यंत पोचवत नाहीत. बहुतेक घरातून मोबाईलच्या सवयी ह्या अभ्यासाशी जोडलेल्या असतात. एकूणच डिजिटल वर्तनातून मनोसामाजिक परिणाम होऊ नयेत हा काही विचार नसतो. अभ्यास होत नाहीये, परीक्षा आलेली आहे, दहावी आहे, कमी मार्क मिळाले तर काय, चांगलं कॉलेज मिळालं नाही तर काय.. हे सगळे मुद्दे अचानक महत्वाचे व्हायला लागले की आईबाबा मोबाईलचं रेशनिंग सुरु करतात आणि त्याची सवय नसलेली मुलं वैतागतात. कुठलीही सवय तडकाफडकी बदलता येत नाही, तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्रास होऊ शकतो हे मात्र या सगळ्यात कुठेही विचारात घेतलं जात नाही. हातातल्या मोबाईल विषयी किंचितही संवाद न साधता अचानक मोबाईलसाठी नियम लावले गेले की मुलं ते स्वीकारत नाहीत. कालपर्यंत नियम नव्हते, आजच का मग? हा त्यांचा सरळ सरळ प्रश्न असतो. जी मोडीत काढता येत नाही. काही मुलं मार्क पाडून आईबाबांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात तर काही आरडा ओरडा करुन. पण या कशाचाच उपयोग मुलांचं बदलणारं वर्तन सावरु शकत नाही. त्यामुळे मुलांशी सायबर संवाद मोबाईलची ओळख झाल्या दिवसापासून गरजेचा असतो. जो घराघरातून अजिबात होत नाही.

टिनेजर्सच्या वर्कशॉप्समध्ये अनेकदा मुलं एक नोंद आवर्जून करतात. ती म्हणजे आम्ही जसे नाही तसे दाखवण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर करतो आणि त्याचा ताण येतो. हा ताण फक्त मुलांवर येतोय असं नाहीये, हा ताण मोठ्यांवरही येत असतो. आपण जे नाही, किंवा आपण जसे असायला हवे तसे दाखवण्याचा प्रचंड ताण सोशल मीडिया तयार करत असतं. कारण इथे प्रत्येक जण त्यांचं ‘बेस्ट’ दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. आणि ते स्वाभाविकही आहे. पण हे सगळं करत असताना आपण हे का करतोय आणि तिथे जरी आपलं सगळं ‘बेस्ट’ दिसत असलं तरी आपल्यात या या गोष्टींची कमतरता आहे, हे दुर्गुण आहेत याचा स्वीकार आवश्यक असतो. पण होतं काय, सतत ‘बेस्ट’ दाखवण्याच्या, दिसण्याच्या धावपळीत आपण खरे कसे आहोत याकडे दुर्लक्ष होतं आणि आभासी जगातले आपण विरुद्ध प्रत्यक्ष आपण असा एक झगडा आपल्याही नकळत आपल्या आत सुरु होतो. टिनेजर्सच्या बाबतीत तर हा झगडा काहीवेळा इतका तीव्र होतो की, आपण नक्की कसे आहोत? ऑनलाईन जगातले खरे, की ऑफलाईन जगातले खरे हेच कळेनासं होतं आणि त्यातून मुलांवर प्रचंड ताण येतो. त्यातून चिडचिड वाढते. स्वप्रतिमेचे प्रश्न तयार होतात. स्वतःच्या प्रत्येक कृतीवर, विचारावर शंका घ्यायला सुरुवात होते. एका विचित्र चक्रात ही मुलं अडकत जातात. प्रत्यक्ष जगातून जर पुरेसं कौतुक, प्रोत्साहन मिळत नसेल, काहीतरी मिळवल्याची भावना पूर्ण होत नसेल, रंग-रूपाविषयी नाराजी असेल तर मग हळूहळू सोशल मीडियावरचं अवलंबत्व वाढायला लागतं. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर करण्याकडे ही मुलं त्यांच्याही नकळत खेचली जातात. पुन्हा यासगळ्यात जे घडतंय त्याविषयी कुणाशीही संवाद नसतो. तो करण्याची इच्छा असली तरी कुणाशी करायचा हे समजत नाही आणि गुंते वाढत जातात.

त्यातून मग आयसोलेशन… म्हणजे स्वतःच्या खोली किंवा मोबाईलमध्ये स्वतःला कोंडून घेणं, अचानक स्वतःच्या ‘स्पेस’ बद्दल बोलायला लागणं, ऑफलाईन कुठलीही गोष्ट अत्यंत कंटाळवाणी वाटणं आणि ऑनलाईन गेल्यावर भारी वाटणं सुरु होतं. आणि कालपर्यंत आपल्या गळ्यात पडणारं पोर अचानक असं का वागू लागलं आहे या विचाराने आईबाबा भांबवून जातात.

टीनएजर मुलांच्या आयुष्यातला हा गुंता सोडवायचा असेल तर त्यांच्याशी स्क्रीन बद्दल खूप लवकर बोलायला सुरुवात केली पाहिजे. ज्या क्षणी आपण त्यांना फोन देतो, (मग तो त्यांचा स्वतःचा किंवा पालकांचा) तेव्हाच त्यांना समजेल अशा पद्धतीने या स्क्रीनचे फायदे तोटे सांगितले पाहिजेत. त्या संदर्भात काही नियम केले पाहिजेत. ते काटेकोरपणे पाळले जातायेत ना हे बघितलं पाहिजे. अचानक केलेला कुठलाही बदल आपण मोठेही अनेकदा स्वीकारत नाही, मग मुलांकडून कशी अपेक्षा करणार?