Ramadan 2023 Fasting: रमजान हा मुस्लिम बांधवासाठी महत्त्वाचा सण आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लिम 30 दिवस उपवास ठेवतात. इस्लाम धर्म मानणारे लोक रमजानमध्ये सकाळी सेहरी म्हणजेच नाश्त्याच्या वेळी अन्न खातात आणि दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की रमजानमध्ये लोक उपवास सोडण्यासाठी फक्त खजूर वापरतात. खजूर खाऊन उपवास सोडण्यामागे धार्मिक कारणासोबतच शास्त्रीय कारणही आहे.

खजूर घेऊन उपवास सोडण्याचे धार्मिक कारण

रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास सोडण्यामागे धार्मिक कारण आहे. असे म्हटले जाते की, इस्लाममध्ये खजूर महत्त्वाचे मानले जातात आणि ते पैंगबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते खजूर खाऊन उपवास सोडत असे. त्यामुळे आजही खजूर खाऊ उपवास सोडला जातो.

Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

हेही वाचा : हेल्दी अन् टेस्टी पनीर धिरडे, नाश्त्यापासून जेवणापर्यंत केव्हाही खाऊ शकता! जाणून घ्या रेसिपी

खजूर खाऊन उपवास सोडण्याचे शास्त्रीय कारण

उपवास सोडण्यासाठी खजूर वापरण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. डॉक्टर सांगतात की, खजूर खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, कारण दिवसभर उपवास केल्याने ऊर्जा पातळी कमी होते आणि म्हणून खजूर खाल्ले जातात. याशिवाय खजूर पचनासाठीही खूप चांगले असतात.

हेही वाचा : तुम्ही कधी आंबट चिंच भात खाल्ला आहे का? नाही मग आता लिहून घ्या रेसिपी

खजूर खाल्ल्याने अनेक पोषकतत्त्वे मिळतात

खजूरमध्ये भरपूर फायबर, लोह, कॅलरीज, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि तांबे असतात, जे शरीराला शक्ती देण्यासाठी खूप महत्वाचे आहे. केवळ खजूर खाल्ल्याने शरीराला दिवसभरात आवश्यक तेवढे फायबर मिळू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खजूर खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, त्यामुळे दिवसभर उपवास केल्याने येणारा अशक्तपणा दूर होतो.