Paneer Dhirde Recipe: पनीर धिरडे असा पदार्थ आहे जो तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपार किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत केव्हाही खाऊ शकता. घरांमध्ये नेहमी पारंपरिक पद्धतीने धिरडे तयार केले जाते, परंतु जर तुम्ही त्याला थोडासा ट्विस्ट देऊ इच्छित असाल तर मग पनीर धिरडे नक्की तयार करुन बघा.पनीर धिरडे स्वादिष्ट तर आहेच पण तो आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पनीरमुळे त्यामध्ये प्रथिनांचा भरपूर स्त्रोत असतो. मोठ्यापासून छोट्यांपर्यंत सर्वजण हा पदार्थ आवडीने खातात. तुम्ही बेसनाच्या किंवा मुगाच्या धिरड्याचा आस्वाद कित्येक वेळा घेतला असेल पण यावेळी जरा हटके आणि नवीन पदार्थाचा आस्वाद घेऊ या. पनीर धिरड्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि हे झटपट तयार केली जाऊ शकते. याच कारणामुळे पनीरचे धिरडे नाश्त्याच्या वेळी खाण्यासाठी पसंती दिली जाते. जर तुम्ही कधी पनीरचे धिरडे केले नसेल तर आम्ही सांगितलेली सोप्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते सहज तयार करु शकता. हेही वाचा : डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवणे का महत्वाचे आहे? जाणून घ्या ‘आयुर्वेद’ काय सांगते पनीरचे धिरडे तयार करण्यासाठी रेसिपी साहित्य - किसलेले पनीर - १.५ कपबेसन - २ वाट्याओवा- १/२ टीस्पूनहिरवी मिरची चिरलेली - ३-४चाट मसाला - १ टीस्पूनहिरवी कोथिंबीर चिरलेली - 3 चमचेतेलमीठ - चवीनुसार कृती - पनीरचे धिरडे तयार करण्यासाठी प्रथम पनीर किसून घ्या. आता एका खोलगट भांड्यात बेसन घालून घेऊन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला आणि ओवा घालून एकत्र करुन घ्या. आता थोडं थोडं पाणी घालून बेसनाचे पीठ तयार करा. बेसनाचे पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसावे हे लक्षात ठेवा. आता एक नॉनस्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा. आता एका चमच्याने बेसनाचे पीठ घेऊन ते तव्याच्या मध्यभागी ओतावे आणि गोल गोल पसरावे. यानंतर किसलेले पनीर धिरड्यावर सर्वत्र पसरावा आणि चमच्याने हलके दाबून घ्या. हेही वाचा : Cucumber Cold Soup Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार काकडी सूप; दिवसभर राहा हायड्रेट यानंतर धीरड्यावरवर थोडा चाट मसाला टाका. थोड्या वेळाने धिरडे पलटून दुसऱ्या बाजूला तेल लावा. पनीरचे धिरडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. यानंतर पनीर धिरडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे एक एक करून सर्व पिठ आणि पनीरचे धिरडे तयार करा. चवदार पनीरचे धिरडे हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.