Premium

तुम्ही रोज काजू, बदाम, मनुक्यासारखा सुकामेवा खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे

Dry Fruits Eating Do’s & Don’ts: ड्रायफ्रुट्सचे फायदे पाहून त्याचे नियमित सेवन करण्याआधी काही गोष्ट आपणही लक्षात घ्यायला हव्यात, याविषयी तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेऊया..

What Happens To Body If You Eat Dry Fruits Kaju Badaam Manuka Everyday Health Expert Tells Benefits What to Do and Not
फायदा आहे म्हणून सुक्या मेव्याचे सेवन रोज करावे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dry Fruits Eating Do’s & Don’ts: अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने युक्त, सुकामेवा खाण्याचे फायदे आपण सगळेच जाणतो. शरीराला ऊर्जा व पोषण दोन्ही देण्यासाठी सुक्या मेव्याची मदत होते. शिवाय यातील फायबरमुळे पचनाचा वेग वाढून पोटाचे आरोग्य सुद्धा सुधारते. पण फायदा आहे म्हणून सुक्या मेव्याचे सेवन रोज करावे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “तुमच्या आहारात सुका मेवा समाविष्ट केल्याने रोगप्रतिकारक शक्ती, दृष्टी आणि ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत होऊ शकते. सुकामेवा, विशेषतः तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.

मनुका, जर्दाळू या प्रकारचा सुकामेवा पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध असतो. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. शिवाय यामुळे पचन आणि आतड्याच्या हालचालींना देखील मदत होते ज्यामुळे तुमचे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते आणि अतिखाण्यावर नियंत्रणं ठेवता येते, या एकंदरीत फायद्यांमुळे सुकामेवा तुम्हाला वजन कमी करण्यात सुद्धा मदत करू शकतो.

डॉ. करण उद्देश तनुगुला, सल्लागार जनरल फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल्स सांगतात की, ड्रायफ्रुट्सचे फायदे पाहून त्याचे नियमित सेवन करण्याआधी एक गोष्ट आपणही लक्षात घ्यायला हवी. “ड्रायफ्रुट्समध्ये जेव्हा साखर आणि मीठ या स्वरूपात कॅलरी जोडलेल्या असतात तेव्हा त्यांचे सेवन फायद्यांपेक्षा नुकसानच जास्त करू शकते.”

आहारतज्ज्ञ सुषमा सांगतात की, “सुकामेवा जरी आपण आहारात गरजेनुसार जास्त प्रमाणात समाविष्ट करत असाल तरी त्याच्या पचनासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये पोषकसत्वांसह कॅलरी व नैसर्गिक शर्करा जास्त असू शकते, म्हणून ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची संभाव्य वाढ होऊ शकते. त्यामुळे समजा जर तुम्हाला वजन किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सुका मेवा प्रमाणात खाणे किंवा महिन्यातून ठराविक दिवशीच खाणे उत्तम ठरेल. शिवाय, तुम्हाला कुठल्याही पदार्थाची ऍलर्जी असेल तर शरीराच्या लक्षणांकडे सुद्धा लक्ष द्या. “

हे ही वाचा<< ‘या’ घरगुती तेलाने वाढतं चांगलं कोलेस्ट्रॉल? हृदयाचा फायदा होतो का, रोज किती व कसे करावे सेवन?

सुका मेवा खाताना काय करावे की करू नये? (Dry Fruits Eating Do’s & Don’ts)

  • 1/4 कप पेक्षा जास्त सुका मेवा खाऊ नका
  • साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी अतिरिक्त साखर असणाऱ्या सुक्यामेव्याचे सेवन टाळा.
  • सुकामेवा खाताना भरपूर पाणी प्या अन्यथा आपण लवकर डिहायड्रेट होऊ शकता.
  • सुका मेवा संतुलित आहाराचा भाग असावा ज्यात ताजी फळे, ताज्या भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश असावा.
  • सल्फर डायऑक्साइड फवारलेला सुकामेवा टाळण्यासाठी लेबल तपासा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What happens to body if you eat dry fruits kaju badaam manuka everyday health expert tells benefits what to do and not svs

First published on: 13-09-2023 at 15:47 IST
Next Story
Health Special: खाण्याच्या पदार्थांची एक्स्पायरी डेट तुम्ही चेक करता का?