आजकाल अनेकांना मानेचा स्पॉन्डिलायटीस, मानेचा स्पॉन्डिलायटीस त्रास होतोय असे ऐकू येते. तसेच काही जणांना कंबरदुखी व पायामध्ये सायटिकाचा त्रास आहे असेही आपण ऐकून असतो. स्पॉन्डिलायटिस हा मणक्याला होणारा आजार. ज्यामुळे मणक्याच्या आणि माकड हाडांच्या जोडामध्ये मध्ये वेदना, कडकपणा आणि जळजळ होते (मणक्याला श्रोणीला जोडणारे सांधे). स्पॉन्डिलायटिसचा सर्वात गंभीर प्रकार म्हणजे अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा अनेक वर्षे चालणारा दाहक रोग आहे.

स्पॉन्डिलायटीसच्या इतर प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे
सोरायटिक (Psoariatic) स्पॉन्डिलायटिस: या प्रकारचा स्पॉन्डिलायटिस सोरायसिस असलेल्या लोकांमध्ये होतो, त्वचेची स्थिती ज्यामुळे स्केलिंग आणि जळजळ होते.
प्रतिक्रियात्मक (Reactive) संधिवात: या प्रकारचा स्पॉन्डिलायटिस एखाद्या संसर्गानंतर होतो, जसे की लैंगिक संक्रमित संसर्ग किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्ग.
एन्टरोपॅथिक (Enteropathic) स्पॉन्डिलायटिस: या प्रकारचा स्पॉन्डिलायटिस दाहक आतड्यांसंबंधी रोग असलेल्या लोकांमध्ये होतो, जसे की क्रोहन (Crohns) रोग किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस.
जनुकांच्या दोषांमुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे याचे प्रमाण वाढू लागले आहे.
आपला कणा हा ३३ मणक्यांचा बनलेला असून तो आपल्या डोक्याच्या खालच्या भागापासून निघून खाली दोन नितंबाच्या मध्येपर्यंत पसरलेला असतो. माकडहाड हे त्याचं खालचं टोक होय. हा असा कणा एकदम सरळसोट नसतो तर त्याला मान व कंबर या दोन ठिकाणी बाक आलेला असतो. आपलं वजन नीट संतुलित व्हावं म्हणून हे दोन बाक असतात आणि याच दोन ठिकाणी स्पॉन्डिलायटीसचा त्रास उदभवू शकतो.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Teacher Use Simple language and relatable examples To Teach lesson on good touch bad touch For Boys
VIDEO : मुलगेही होतात ‘बॅड टच’चे शिकार? ‘असे’ प्रसंग कसे टाळायचे? पाहा शिक्षिकेने ‘असा’ घेतला सराव
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

आणखी वाचा: सततची मानदुखी आहे गंभीर आजारचे लक्षण; आयुर्वेदात सांगितलेल्या ‘या’ औषधामुळे मिळू शकतो त्वरित आराम

प्रत्येक दोन मणक्यामध्ये सांधा बनलेला असतो. ज्याला आम्ही Intervertebral Joint असं संबोधतो. जसंजसं वय वाढत जातं, तसतशी या मणक्यांची सांध्याजवळ झीज होत राहते. यामुळे मणक्यांतून निघणाऱ्या नसा दबल्या गेल्याने मान दुखणे किंवा हात- पाय दुखणे, हात व पाय बधीर होऊन मुंग्या येणे, हात- पायात अशक्तपणा जाणवणे वगैरे तक्रारी सुरुवात होते. जर हा नसांवर येणारा दाब जास्त प्रमाणात असेल तर शरीराचा तोल जाणे वा लघवी संडासावरचा ताबा जाणे अशा प्रकारचा त्रासही संभवू शकतो. मानेच्या मणक्याच्या दुखण्यास Cervical Spondilitis सर्विकल स्पोनडीलायटीस असं म्हणतात तर कंबरेच्या मणक्याच्या दुखण्यास Lumbar Spondilitis असं म्हणतात.

कारणमीमांसा
याचं मुख्य कारण वर सांगितल्याप्रमाणे वयोमानानुसार होणारी झीज हे असलं तरी सध्या तरुण वर्गात मानेच्या स्पॉन्डिलायटीसचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. आजची तरुण पिढी तासनतास कॉम्पुटरसमोर एकाच पोझिशनमध्ये बसून काम करते. बायका घरात रिकामावेळ घालवण्यासाठी टीव्हीसमोर बसून अगदी तल्लीनतेने एकापाठोपाठ एक टीव्ही सीरिअल्स पाहत असतात. टीव्ही पाहताना झोपून टीव्ही नीट दिसावा म्हणून अनेकदा मानेखाली तक्का किंवा लोड घेतला जातो. या सर्वांचा ताण मानेच्या मणक्यावर पडत राहतो व cervical स्पॉन्डिलायटीसचं दुखणं लवकर सुरु होतं.

या शिवाय :

१) एकसारखे long driving करणे
२) एका हाताने जड ओझं उचलणे (यामध्ये नस खेचली जाते)
३) झोपताना उंच किंवा अति मऊ उशी घेणं
४) बोथट सुरीने रोज भाज्या कापत राहण
ही cervical spondylitis होण्याची अजून काही कारणं आहेत. आपल्या संपूर्ण हातात कळ येत असेल व मान वर करून खोकताना हे दुखणं वाढत असेल तर स्वतःला मानेचा spondylitis झाला आहे असं निदान करायला काही हरकत नाही. कंबरेचा spondylitis हा झटकन वाकल्याने वा वाकून झाल्यावर झटकन उठल्याने , तसच कंबरेचे ,पायाचे व्यायाम चुकीच्या पद्धतीने केल्याने होतो.

आणखी वाचा: सतत मानदुखी ‘हे’ असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण; आजच धोका ओळखून ‘हे’ घरगुती उपचार करा सुरु

स्पॉन्डिलायटिसची लक्षणे साधारण: अशी असतात
-मान व पाठीमध्ये वेदना आणि कडकपणा
-मणक्यातील हालचालींची कमी
-थकवा
-गुडघे, घोटे आणि खांदे यांसारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये वेदनादायक किंवा सांधे कडक होणे
-मणक्यामुळे जर मज्जातंतू वर दाब आल्यास हातपायमध्ये वेदना होणे व पुढच्या आजारात त्यातील हालचाल कमी होऊ शकते.
-स्पॉन्डिलायटिसचे निदान डॉक्टरांनी शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहास आणि इमेजिंग चाचण्या, जसे की एक्स-रे, एमआरआय किंवा सीटी स्कॅनवर आधारित केले आहे. तसेच काही बाबतीत रक्ताच्या विविध तपासण्या (HLA B २७) करून स्पोंडीलायटिस चे निदान करता येते स्पॉन्डिलायटीस रोखण्यासाठी कोणताही इलाज नाही, परंतु असे उपचार आहेत जे लक्षणे दूर करण्यास मदत करू शकतात.

उपचार पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहे
उपाय योजना
१)आराम: मानेला / कंबरेला आराम मिळेल असे पाहिले पाहिजे. वाकू नये ;खाली बसू नये ; किंवा खाली वाकून जड वस्तू उचलू नये. कधी कधी आराम मिळावा यासाठी डॉक्टरी सल्याने बेल्ट वापरावा.
२) शेकणे :गरम पॅडने वा गरम पाण्याने शेकल्याने दुखणे थोडे कमी होते.
३)औषधे: दुखणे कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. हाडं मऊ ,ठिसूळ झाली असतील तर कॅल्शियम ,ड जीवनसत्व या सारखी औषध देऊन हाडं मजबूत बनवली जातात. नसांना ताकद देणारी बी कॉम्प्लेक्स व इतर टॉनिक्स सारखी औषधही अनेकदा दिली जातात. बऱ्याच वेळ आपण टीव्ही वर जाहिराती बघतो परंतु त्याचा फायदा तात्पुरताच असतो.
४) फिजिओथेरपी : SWD (short wave diathermy) म्हणजे यामध्ये मान / कंबर या ठिकाणी हिटपॅड ठेऊन शेक दिला जातो. काही व्यायामप्रकार शिकवले जातात ,यामुळे सांधे मोकळे होतात व स्नायूंना बळकटी येते. व्यायाम: मणक्याची लवचिकता आणि गती राखण्यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
५) ट्रॅक्शन: मानेला व कंबरेला कधी कधी हे लावायला लागते , त्यामुळे दुखणं कमी होते.
६)ऑपरेशन :वरील सर्व उपायांनी दुखण्याला आराम पडला नाही किंवा हातापायातला बधिरपणा,कमजोरी व वेदना यांचे प्रमाण वाढतच गेलं तर ऑपरेशन करून या नसा मोकळ्या केल्या जातात. काही प्रकरणांमध्ये, वेदना कमी करण्यासाठी आणि कार्य सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.

तुम्हाला वेदना, कडकपणा किंवा स्पॉन्डिलायटीसची इतर लक्षणे जाणवत असल्यास, निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान आणि उपचार केल्याने स्थिती वाढण्यापासून आणि मणक्याचे आणखी नुकसान होण्यापासून रोखता येते.

स्पॉन्डिलायटीस टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?
-कॉम्प्युटरवर काम करण्याऱ्या तरुणांनी आपली बैठक सुधारावी. कॉम्पुटर स्क्रीन डोळ्यापेक्षा वर नसावा. म्हणजे मान वाकडी किंवा वर करावी लागणार नाही
-एकाच स्थितीमध्ये मान राहत असल्याने मधून मधून मानेचे व्यायाम करत राहावे.
-टीव्ही पाहताना दोन प्रोग्राम्स मध्ये थोडे अंतर ठेवावे. फार टीव्ही पाहू नये. लोड डोक्याखाली ठेवून तर टीव्ही पाहणे बंद करावे.
-चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, वाकणे तसेच चुकीच्या पद्धतीने कॉम्पुटर वर काम करणे टाळावे.
-मोठा लोड वा जड उशी डोक्याला घेऊन झोपू नये.
-जड समान पटकन उचलणे टाळावे.
-साधारणपणे चाळीशीनंतर कॅल्शियमची गोळी घेणे सुरू करावे.
-रोज सकाळ संध्याकाळ एक एक ग्लास दूध प्यावे किंवा दही खावे.
-रोज पूर्ण शरीराला सूर्यप्रकाश मिळेल अशा बेताने फिरावे.जेणेकरून हाडांमध्ये व्हिटॅमिन ड तयार व्हावे व पुढील दुखणी टाळावीत.
-नियमितपणे वॉर्मिंगअप सारखे व्यायाम करणे- जेणेकरून सर्व सांधे व सर्व स्नायू यांची हालचाल होईल हे पाहावे.