आहारामध्ये फळे, भाज्या, धान्यापासून तयार केलेले ब्रेड, ऑलिव्ह ऑइलचा समावेश केल्याने आयुर्मान वाढत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

हा अभ्यास जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. दाहशामक पदार्थाचा आहारात समावेश केल्यामुळे आयुर्मान वाढत असून कर्करोग आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी होतो. पोलंडमधील वॉरसॉ विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासात ४५ ते ८३ या वयोगटातील ६८,२७३ पुरुष आणि महिलांचा समावेश होता. १६ वर्षे या लोकांचा अभ्यास करण्यात आला. जे लोक  दाहशामक आहाराचे सेवन करीत होते. त्यांना मृत्यूचा धोका १८ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका २० टक्क्यांनी तर कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका १३ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

कमी प्रमाणात दाहशामक घटकांचा आहारात समावेश केल्यामुळेदेखील आरोग्यास फायदा होत असल्याचे आमच्या विश्लेषणात आढळून आल्याचे वॉरशॉ विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका जोएन कलुजा यांनी सांगितले.

धूम्रपान करणाऱ्या लोकांनादेखील या आहाराचे फायदे अनुभवले. दाहशामक पदार्थामध्ये फळे, हिरव्या भाज्या, चहा, कॉफी, धान्यापासून तयार केलेले ब्रेड, लो-फॅट चीज, ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल, काजू, बदाम, चॉकलेट, कमी प्रमाणात रेड वाइन यांचा समावेश होतो.