कमी उत्पन्न गटातील महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त असते, असा अभ्यासपूर्ण अहवाल नुकताच समोर आला आहे. याबाबत तज्ज्ञांनी २२ कोटी लोकांवर संशोधन केले. त्यापैकी बऱ्याच महिलांची आर्थिक परिस्थिती कमी उत्पन्न गटात मोडणारी होती. त्यांच्यामध्ये हृदयाशी संबंधित रोगाचे प्रमाण जास्त आढळून आले. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की कमी उत्पन्न गटातील महिलांमध्ये हृदयरोगाशी संबंधित समस्यांचे प्रमाण इतर उत्पन्न गटातील स्त्री व पुरुषांपेक्षा जास्त आहे. यामध्येही कमी उत्पन्न गटातील पुरुषांमध्ये हृदयाला झटका येण्याचे प्रमाण हे स्त्रियांमध्ये कमीच आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील महिला व पुरुषांमध्ये हृदयरोगाचा धोका हा सारखाच असतो; उलट महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका उत्पन्न होण्याचा काळ पुरुषांच्या तुलनेत १० वर्षांनी जास्त असतो.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)