गेल्या तीन वर्षांत देशातील एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पण त्याचबरोबर काही राज्ये एचआयव्ही संसर्गाची नवी ठिकाणे म्हणून सामोरी आली आहेत, असे संसदेत आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले, की इतर राज्यात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असून मेघालय, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तीन वर्षांत एकूण एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये २,००,४६५ जणांना एचआयव्ही बाधा झाली. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण १,९३,१९५ होते. तर २०१७-१८ मध्ये ते १,९०,७६३ झाले. तीन वर्षांत महाराष्ट्रात एचआयव्हीचे प्रमाण जास्त असून तेथे २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार  २८,०३० रुग्ण आहेत. मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यात एचआयव्हीचा प्रादुर्भाव वाढत आहे कारण तेथे गर्भवती महिलांमध्ये व जोखमीच्या गटात (वेश्या व इतर) एचआयव्हीचे प्रमाण जास्त आहे. देशभरात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असताना या तीन राज्यांत मात्र एचआयव्हीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.  महाराष्ट्रातील  परिस्थितीही फार चांगली नाही. काही वेळा वापरलेल्या सुया वापरल्यामुळेही या विषाणूची लागण होते, तर अनेकदा असुरक्षित लैंगिक संबंधातून त्याची लागण होताना दिसून येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiv aids in maharashtra
First published on: 04-08-2018 at 01:01 IST