Home Remedies: घराच्या भिंतींवर किंवा बाथरुममध्ये अनेकदा पालींचा वावर आढळतो. अनेकांना पालीची भीती वाटते, त्यामुळे तिला पाहून घाम फुटतो. बाथरुममध्ये पाल दिसल्यानंतर बऱ्याचदा आत पाऊल ठेवायलाही भीती वाटते. शिवाय पाल जर स्वयंपाकघरात फिरताना दिसली की जेवण बनवतानाही खूप काळजी घ्यावी लागते. कारण, पाल जर अन्नात पडली तर अन्न विषारी बनते, ज्यामुळे विषबाधादेखील होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या घरातून पालीला पळवायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता.

पालीला घरातून पळवून लावण्यासाठी टिप्स

अंड्याचे कवच

अंड्याची टरफले पालीला पळवण्यास मदत करू शकतात. पाल अंड्याच्या कवचापासून दूर पळते. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पाल जास्त दिसते, त्या ठिकाणी ही टरफले ठेवा. असे केल्याने तुम्ही पालीपासून सुटका मिळवू शकता.

मिरपूड स्प्रे वापरा

पाल मुख्यतः घरांच्या छतावर किंवा भिंतीवर आढळते. अशावेळी आपण छतावर अंड्याचे कवच ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मिरपूड स्प्रेची मदत घेऊ शकता. यासाठी एका स्प्रे बाटलीत पाणी भरून त्यात काळी मिरी घाला. छतावर कुठेही पाल फिरताना दिसली की लगेच हा स्प्रे तिच्या अंगावर फवारा, ज्यामुळे ती घरातून पळून जाईल.

कांद्याचा वापर करा

पालीला पळवण्यासाठी तुम्ही कांदा वापरू शकता. त्यासाठी कांदा धाग्याने बांधू शकता आणि भिंतीवर लटकवू शकता. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याला उग्र वास येतो. या दुर्गंधीमुळे पाल पळून जातात.

कांदा-लसूण स्प्रे वापरा

पालीला पळवण्यासाठी तुम्ही एका स्प्रे बाटलीत कांदा आणि लसूण रस भरा. आता त्यात थोडे पाणी घाला. बाटली चांगली हलवून पाणी आणि रस मिसळा. आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा.

नॅप्थालीन गोळ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपड्यांपासून किडे दूर ठेवण्यासाठी आणि पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही नॅप्थालीन गोळ्यादेखील वापरू शकता. या गोळ्या तुम्ही कपाटाच्या वर ठेवू शकता.