scorecardresearch

Premium

गावकऱ्यांनी घरांकडे पाठ फिरवली, अन् निसर्गानं मात्र ‘घरपण’ दिलं

हे सारंच कलात्मक दिसत होतं. प्रथमदर्शी ओसाड गावाकडे पाहून भीती वाटतं असली तरी यातही निसर्गाचं सौंदर्य लपलं असल्याची जाणीव त्याला झाली.

ओसाड पडलेल्या या गावाला निर्सगानं आपलंसं केलेलं पाहून एक क्षण त्याची निराशा कुठच्या कुठे पळाली.
ओसाड पडलेल्या या गावाला निर्सगानं आपलंसं केलेलं पाहून एक क्षण त्याची निराशा कुठच्या कुठे पळाली.

पंचवीस एक वर्षांपूर्वी चीनमधल्या हाऊटुवान गावात शेकडो लोक राहत होते. पण हळूहळू गावातील लोक पोटापाण्यासाठी गावाबाहेर पडू लागले. जे गाव सोडून निघून गेले ते पुन्हा कधीही परतले नाही. गाव ओस पडू लागलं, लोक आपलं घरही पाहायला येईनासे झाले. अखेर ज्या घरांकडे माणसांनी पाठ फिरवली त्याच घरांना निसर्गानं ‘घरपण’ दिलं आणि आपल्यात सामावून घेतलं.

काही वर्षांपूर्वी एका स्थानिक छायाचित्रकाराच्या नजरेस ही जागा पडली. ओसाड पडलेल्या या गावाला निर्सगानं आपलंसं केलेलं पाहून एक क्षण त्याची निराशा कुठच्या कुठे पळाली. हे सारंच कलात्मक दिसत होतं. गावातील प्रत्येक घरांवर चढलेल्या वेली, सगळीकडे उगवलेलं गवत, गावाचं जंगलात झालेलं रुपांतर हे सगळंच पाहून प्रथमदर्शी भीती वाटतं असली तरी यातही सौंदर्य लपलं असल्याची जाणीव या छायाचित्रकाराला झाली मग काय त्यानं याचे फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड केले अन् अल्पावधीत विस्मरणात गेलेलं हे हाऊटुवान गाव प्रसिद्ध झालं.

फार पूर्वी या गावात २ हजारांहून अधिक लोक राहायचे. तर जवळपास पाचशे लहान मोठी घरं गावात होती. पण कामानिमित्त अनेकजण गाव सोडून शहरांकडे वळू लागली. जे लोक गाव सोडून गेले ते परत कधीही आले नाहीत. पूर्वी पाचशे घर असलेल्या या गावात आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच घरांत लोक राहत आहेत. बाकी शेक़डो घरांवर रानवेली, गवत वाढलं आहे, गावाचं रुपांतर जंगलात झालं आहे. जरी घरांवर शेवाळं, गवत, वेली वाढल्या असल्या तरी या गावाचं सौंदर्य मात्र अधिक खुलून दिसत आहे त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी का होईना गावाकडे वळत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Home was abandoned by man has been reclaimed by nature

First published on: 18-06-2018 at 14:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×