होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने आपली लोकप्रिय बाइक ‘CB युनीकॉर्न 150’ अपडेट करुन पुन्हा एकदा भारतीय बाजारात उतरवली आहे. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम(एबीएस) या नव्या फीचरचा या बाइकमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासून भारतात वाहनांसाठी नवे सुरक्षा नियम लागू होणार आहेत. त्यानुसार अनेक कंपन्या आपल्या गाड्या अपडेट करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Honda CB Unicorn 150 मध्ये सिंगल-चॅनल एबीएस आहे. याशिवाय बाइकला ट्युबलेस टायरने अपडेट केलं आहे. बाइकच्या पुढील चाकाला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आला असून एबीएस फीचर यासोबतच देण्यात आलं आहे. तर मागील चाकाला 130mm ड्रम ब्रेक सेटअप देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त बाइकमध्ये अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda cb unicorn 150 abs launched
First published on: 27-02-2019 at 16:47 IST