होंडा टू-व्हिलर्स इंडियाने आपली लोकप्रिय बाईक Honda cb unicorn 160 चं भारतातील उत्पादन बंद केल्याचं वृत्त आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर ही बाईक अद्याप सीबीएस प्रकारात उपलब्ध असल्याचं दिसतंय मात्र अजूनही कंपनीने ही बाईक नव्या नियमांनुसार  आवश्यक असलेल्या एबीएस फीचरसह अपग्रेड केलेली नाही. परिणामी कंपनी ही बाईक बंद करण्याच्या विचारात असण्याची  शक्यता आहे. अशातच होंडाच्या देशभरातील बहुतांश डिलर्सनी आपल्याकडे या बाईकचा स्टॉक नसल्याचं सांगितलं, तसंच ग्राहक देखील आता या बाईकची मागणी करत नाहीत असं सांगितलं. फायनान्शिअल टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वृत्तानुसार, आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षभरात unicorn 160 च्या केवळ 13 हजार 266 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजे एका महिन्यात अवघ्या 1 हजार बाईक्सची विक्री झाली. त्यामुळे कंपनीने unicorn 160 चं उत्पादन थांबवलं असल्याची चर्चा आहे. थोड्याच दिवसात ही बाईक कंपनीच्या संकेतस्थळावरुन देखील हटवली जाणार असल्याची माहिती आहे. पण कंपनीने याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda cb unicorn 160 production stopped discontinued in india sas
First published on: 04-07-2019 at 16:46 IST