नव्या संशोधनातील निष्कर्ष
संप्रेरके अवरोधित केल्यास शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढण्याबरोबरच इन्सुलिनच्या प्रमाणातही वाढ होते. त्यामुळे रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण राखण्यास मदत होते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील क्षयरोगावर प्रभावी उपचार करण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात काही क्षयरुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी रुग्णांना सतत इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो. मात्र, या उपचारांना काही प्रमाणात मर्यादा असतात, असे जिनेव्हा विद्यापीठातील प्रेडो हेरेरा यांनी सांगितले.
हेरेरा म्हणाले की, स्वादुपिंडातील संप्रेरके अवरोधित करून अवशिष्ट इन्सुलिननिर्मितीस चालना कशी देता येईल, या विषयावर आम्ही संशोधन केले आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार इन्सुलिनच्या कमतरतेमुळे स्वादुपिंडात निर्माण झालेल्या पॉलिपेप्टाइडचे (ग्लुकॅगॉन) प्रमाण वाढते. या ग्लुकॅगॉनचे संप्रेरक अवरोधित केल्यास रक्तातील शर्करेचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते.
या वेळी इन्सुलिनचा अभाव असला तरी हा मधुमेहावरील रामबाण उपाय असल्याचे संशोधकांचे मत आहे. ग्लुकॅगॉनच्या संप्रेरकांना अवरोधित करणे किंवा इन्सुलिन घेणे हाच पहिल्या टप्प्यातील मधुमेहावर प्रभावी उपाय असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
मात्र, सद्य:स्थितीत इन्सुलिनचे डोस पूर्णपणे कमी न करता ग्लुकॅगॉनची संप्रेरके अवरोधित करण्याचा दुहेरी उपचाराचा अवलंब केला जातो.
काही रुग्णांमधील ग्लुकॅगॉनची संप्रेरके अवरोधित केल्यानंतर रक्तातील शर्करेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवण्यात संशोधकांना यश आले.