Ajwain Water Benefits: ओवा हा औषधी गुणधर्मांसाठी वापरल्या जाणार्‍या सर्वात जुन्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. त्याला इंग्रजीत कॅरम सीड्स म्हणतात. या लहान बिया अनेक भारतीय पदार्थांमध्ये वापरल्या जातात. ते पचन आणि शोषणास मदत करतात. लोक ते कच्च्या स्वरूपात देखील खातात. ओव्याचे फायदे त्याच्या चव आणि वासापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत.

ओव्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी या बिया फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया की वैद्यकीय शास्त्रानुसार, ओव्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी खरोखर प्रभावी आहे का?

diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
Alia Bhatt namaskar vahini video viral
Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
weight loss tips
लठ्ठपणा कमी करू शकते जिरा आणि ओवा, असे करा वापर

विज्ञानानुसार ओव्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी कसे प्रभावी आहे?

Healthifyme च्या बातमीनुसार, ओवा आरोग्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे कारण त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन आणि फॅट भरपूर असतात. या बियांमध्ये नियासिन, पोटॅशियम, थायामिन, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे शरीर निरोगी ठेवतात. ओवा पोषक तत्वांचे शोषण आणि चयापचय वाढवण्यास मदत करतो. ते तुमच्या शरीरातील चयापचय गतिमान करतात, ज्यामुळे अन्न जलद पचते. याचे सेवन केल्याने शरीरात कमी चरबी जमा होते आणि वजन झपाट्याने कमी होते.

(हे ही वाचा: ‘या’ ५ तेलांचा वापर केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील)

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. प्रताप चौहान यांच्या मते, ओव्याचे पाणी वापरल्यास आरोग्याला खूप फायदा होतो. याच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होते. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी या पाण्याचे सेवन खूप प्रभावी ठरते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही एका महिन्यात १ ते २ किलो वजन सहज कमी करू शकता. ओवा पचन सुधारते. हे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होत नाही.

ओव्याचे पाणी कसे तयार करावे

ओव्याचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा अजवाईन टाकून रात्रभर झाकून ठेवा. हे पाणी सकाळी एका पातेल्यात ओटा आणि थोडा वेळा उकळवा. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा ते पाणी गाळून घ्या आणि प्या.