Refrigerator Care Tips : उन्हाळा आला की घरोघरी फ्रिजची सर्वाधिक गरज भासते. थंड पाण्यापासून कोणत्याही पेयापर्यंत, जेवण असो की फळ भाजीपाला, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी फ्रिजची आवश्यकता भासते. अशात जर भर उन्हाळ्यात तुमचा फ्रिज वारंवार खराब होत असेल तर…? तुम्हीदेखील ही समस्या अनुभवली असेलच, बरोबर ना! अनेकदा अचानक फ्रिज खराब होतो. वारंवार दुरुस्ती केल्यानंतरही फ्रिज व्यवस्थित काम करत नाही. अशा वेळी फ्रिजची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे असते. जर तुम्ही या चार गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा फ्रिज खराब होणे टाळता येऊ शकते. आज आपण त्या चार गोष्टी कोणत्या, याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.

तापमान योग्य ठेवणे

अनेकदा फ्रिजचे तापमान कमी किंवा जास्त झाले तर फ्रिजमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे फ्रिजचे तापमान नेहमी योग्य ठेवणे जास्त गरजेचे आहे. तापमान नेहमी ३७ ते ४०च्या मध्ये ठेवा आणि फ्रिजर नेहमी शून्य फॅरेनहाइटवर ठेवा.

speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

वीज नसेल तरी फ्रिजचा दरवाजा बंद ठेवा

वीज गेल्यानंतर कधी चुकूनही फ्रिजचा दरवाजा उघडा करू नका. वीज नसताना जवळपास चार तास फ्रिजमध्ये अन्न चांगले राहू शकते. त्यामुळे वीज गेल्यानंतर फ्रिजचा दरवाजा बंदच ठेवा.

हेही वाचा- पाण्याची बाटली खराब झाल्यास कशी करावी साफ? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

फ्रिजचा दरवाजा नेहमी व्यवस्थित बंद करा

अनेकदा फ्रिज उघडताना आणि बंद करताना फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नाही आणि त्यामुळे आपला फ्रिज खराब होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी फ्रिजचा दरवाजा उघडताना आणि बंद करताना काळजी घेणे गरजेचे आहे. दरवाजा उघडा राहिल्याने बाहेरची हवा आत जाते, ज्या मुळे कुबट वास पसरतो आणि मशीनवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते.

फ्रिजच्या कॉइल्सला वारंवार साफ करा

फ्रिजच्या कॉइल्सवर नेहमी धूळ साचते, ज्यामुळे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही कॉइल्स नियमित साफ केल्यास फ्रिज खराब होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय फ्रिज आणि आणि भिंतीमध्ये अंतर ठेवावे. कधीच फ्रिज भिंतीला चिकटून ठेवू नये.

हेही वाचा – Doormat Cleaning Tips: सततच्या वापरामुळे खराब झाले डोअरमॅट? अशा प्रकारे करा साफ

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)