रंगाच्या चकाकीवर रंगकामाची परिणामकता बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. चकाकीवरून तो रंग कुठे वापरायचा हे ठरते. चढत्या भाजणीनुसार फ्लॅट, मॅट, एगशेल, सॅटीन, सेमी ग्लॉस, हाय ग्लॉस अशी विभागणी होते. फ्लॅट, मॅट, एगशेलपर्यंतचे फिनििशग हे कमी चकाकी देणारे आहे. त्यांचा वापर शक्यतो कमी वर्दळीच्या जागी करावा, जसे की बेडरूम, स्टडीरूम वगरे. या प्रकारच्या फिनििशगवरून कमी प्रमाणात प्रकाश परावर्तीत होतो. भिंतीवरील छोटे-मोठ्ठे खड्डे या फिनिशिंगने बऱ्यापकी झाकले जातात. पण कोणाला अगदी जोर लावून भिंत धुवायची सवय असेल तर अशा वेळी हा रंग जरा खराब होऊ शकतो. बाकी सॅटीन, सेमी ग्लॉस, हाय ग्लॉस या फिनिशिंगमध्ये प्रकाश बराच परावर्तीत होतो व त्यामुळे रंगाला चकाकी अधिक येते. जास्त वर्दळीच्या ठिकाणी जसे हॉटेल, लॉबी, ऑफिस किंवा घरात दिवाणखान्यात या फिनिशिंगचे रंग खास करून वापरावेत. तसेच स्वयंपाकघरात जिथे डाग पडायची शक्यता जास्त आहे, अशा ठिकाणी थोडा ग्लॉसी रंगच लावणे जास्त व्यवहारी ठरते. त्यामुळे कितीही जोर करून या भिंती घासल्या तरी रंग खराब होत नाही. पण अर्थातच रंगाची चकाकी ही तुमच्या सजावटीच्या थीमवरसुद्धा अवलंबून असते. फक्त ते एखादे हॉटेल आहे म्हणून सगळ्या भिंती चकमकायला पाहिजेत असे नाही. सजावट जर नसíगक गोष्टी वापरून किंवा इंडस्ट्रिअल लुकवर आधारित असेल तर अशा वेळी मॅट फिनिश, रफ पोत असलेल्या भिंती जास्त अनुरूप दिसतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीतरी महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंटवरून पाहिलेली आकाशातील रंगछटा मनात घर करून बसलेली असते. माझी खोली रंगवताना हीच छटा देणार असे आपण मनात पक्के ठरवतो. कलर शेडकार्डमध्ये आपल्या मनातील रंग मिळाला नाही तर रंगाऱ्याला सांगून दोन-तीन रंग मिसळून पाहिजे ती छटा तयार करून घेतली जाते. पण प्रत्यक्ष चारही भिंती रंगवल्यावर सूर्यास्तामध्ये कमी पडतील एवढय़ा विविध छटा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. जे अर्थातच दिसायला खराब दिसते. यामागील कारण असे की रंगारी चारही भिंतीला पुरेल एवढा रंग तयार करून ठेवत नाही. सुकून वाया जाण्याच्या भीतीने प्रत्येक वेळी थोडा थोडा रंग तयार केला जातो. अशा वेळी दर वेळी बरोब्बर तीच छटा त्याला करता येईल याची खात्री नसते. त्यामुळे कधीही रंग मिसळून भिंती रंगवू नयेत. (अर्थात अगदी छोटी जागा असेल व तयार केलेल्या एका रंगाच्या डब्यात काम होणार असेल तर भाग निराळा). आजकाल रंगाच्या हजाराच्यावर छटा कॉम्प्युटरवर करून मिळतात. त्यातीलच एखादी छटा वापरल्यास सर्व खोलीला एकसमान रंग लागतो. कारण रंगाच्या छटेतील थोडासुद्धा फरक सजावटीला मारक ठरू शकतो.
रंगांच्या बाबतीत आपण आपल्यावर मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत. वॉटर बेस्ड का ऑइल बेस्ड, निळा का हिरवा एवढाच आपण विचार करतो. पण कलर इंडस्ट्रीमध्ये रंगामध्ये मिसळायच्या घटकांमध्ये इतके संशोधन झाले आहे की प्रत्येक जागेच्या कार्यपद्धतीनुसार रंग बनवले जातात. जिथे आग लागण्याची सर्वात जास्त शक्यता आहे अशा सर्वर रूममध्ये खास फायर हॅझार्ड पेंट लावला जातो. लॅब, क्लिनिक जिथे स्वच्छतेची अत्युच्चम काळजी घेतली जाते. कुठल्याही प्रकारच्या जंतूंच्या वाढीला आळा घातला जातो, अशा ठिकाणी अ‍ॅन्टी फंगल पेंट वापरला जातो. शेवटच्या मजल्यावर होणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून वाचवायला हिट-रेझिस्टन्ट पेंट गच्चीला लावला जातो. त्याचप्रमाणे गंज पकडू नये म्हणून अ‍ॅन्टी-करोजन, एखाद्या संगमरवर किंवा नसíगक दगडासारखे भासणारा ईमिटेशन-स्टोन पेंट, चक्रावून टाकणारे टेक्चर पेंट असे कितीतरी प्रकार बाजारात मिळतात. आपल्या गरजेनुसार त्या त्या रंगाचा विचारपूर्वक वापर आपल्या सजावटीत करावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to decide color combination of home
First published on: 11-10-2017 at 14:41 IST