Centipede Repellent Tips Home Remedies : पावसाळ्यात थंड वातावरणाबरोबर गांडूळ, गोम आणि इतर लहान-लहान कीटक- प्राण्यांचा त्रास वाढतो. यात गोम खूप भयानक असते. आकाराने लहान असणारी गोम वेगाने हालचाल करते. घरात दमट आणि अंधाऱ्या जागी ती लपून बसते, तसेच अंथरुणात किंवा कपड्यांत लपून बसून चावण्याचीही भीती असते.
विशेषत: पावसाळ्यात बाथरुमच्या पाईपमधून ती घरात शिरते. लहान मुलांना चावण्याची किंवा त्यांच्या कानात शिरण्याची भीती असते. जर तुमच्या घरातही पावसाळ्यात गोम येण्याचे प्रमाण अधिक असेल तर तुम्ही कोणत्याही घातक केमिकलचा वापर न करता त्यांना घरापासून दूर ठेवू शकता, कसे ते जाणून घेऊ…
गोम, गांडुळांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय (How To Get Rid Of House Centipedes Permanently)

२ चमचे तुरटी पावडर

२ चमचे मीठ

१ चमचा काळी मिरी पावडर

१ लिटर पाणी

अशा पद्धतीने बनवा होममेड स्प्रे

सर्व पावडर एकत्र करून घरात ज्या ठिकाणी गोम अधिक दिसतात त्या जागी शिंपडावे किंवा तुम्ही हे सर्व पदार्थ एक लिटर पाण्यात एकत्र मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरूनही स्प्रे करू शकता. हे मिश्रण कीटकांविरोधात प्रतिबंधक उपाय म्हणून काम करते.

वापरण्याची योग्य पद्धत

घरात अंधार व दमट जागेत जिथून गोम प्रवेश करू शकतात, अशा जागा शोधा. उदाहरणार्थ – बाथरुमचे कोपरे, पाणी जाण्याची जाळी, सिंक, नाले, बेसमेंट, स्टोअर रूम, ओल्या भिंतींमधल्या भेगा आणि खिडक्या-दरवाज्यांची किनार. या जागांवर पावसाळ्यात दर २ ते ३ दिवसांनी हे मिश्रण स्प्रे करत राहा.

तुरटीमध्ये तिखटपणा आणि दुर्गंधहीन गुण असतो, जो अनेक कीटकांना नकोसा वाटतो. तुरटीची पावडर तयार करून दरवाजे, खिडक्यांचे कडे, भेगा, बाथरूमचे कोपरे आणि सिंकजवळ शिंपडा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय तुम्ही एक लिटर पाण्यात दोन चमचे तुरटीची पावडर मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जिथे गोम दिसतात किंवा लपलेले असू शकतात तिथे पावसाच्या दिवसात ३ ते ४ दिवसांनी स्प्रे करा. या उपायांमुळे तुम्हाला घरात गोम, गांडूळ असे कोणतेही कीटक दिसणार नाहीत.