Avoid These 7 Mistakes for Perfect Tea Recipe: भारतीयांचं आवडतं पेय म्हणजे चहा. चहा प्यायला सर्वांनाच आवडते. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. पण, वर वर साधा दिसणारा हा चहासुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण चहाला वेगळीच चव देऊन जाते. प्रत्येक वेळी चहा परफेक्टच बनतो असं नाही. खरं तर चहा बनवताना आपण अनेकदा काही चुका करतो, ज्यामुळे त्याची चव खराब होते. पण, चहामधील वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तर त्याच असतात, तरीही चहाची चव वेगळी कशी? मग चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा, याचा कधी विचार केला आहे का? खरंतर चहातील प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट वेळेला टाकायचे असतात. आम्ही तुम्हाला चहा बनवण्याची खास पद्धत सांगणार आहोत.

तुम्हाला मसाला चहा आवडतो किंवा आल्याचा चहा, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही प्रत्येक वेळी तो परिपूर्ण चहा घरी बनवू शकता. चहा करताना कोणत्या चुका करू नये, हे खालीलप्रमाणे सांगण्यात आले आहे.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
How Alphanso Mango Can Help Loose Weight Control Blood Sugar
आंबा खाल्ल्याने मधुमेहापासून वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो फायदा; पण ‘ही’ खाण्याची पद्धत व रेसिपी नीट बघा

चहा बनवताना ‘या’ चुका टाळा

 • सर्वप्रथम चहा बनवण्यासाठी कधीही कच्चे दूध वापरू नये. चहा बनवण्यासाठी फक्त उकळलेले दूध वापरण्याचा प्रयत्न करा. फ्रीजमध्ये ठेवलेले दूध खोलीच्या तापमानाला येण्यासाठी बाहेर काढा. दोन कप चहा बनवायचा असेल तर एक कप दूध काढून बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही उकळत्या चहामध्ये थंड दूध घालता तेव्हा चहाचे तापमान अचानक बदलते, ज्यामुळे त्याची चव खराब होते.
 • चहामध्ये जोडल्या जाणाऱ्या मसाल्यांबद्दल सांगायचे तर, लोकांना अनेकदा आल्याचा चहा आवडतो. यासाठी नेहमी चहामध्ये ठेचलेले आले घालावे हे लक्षात ठेवा. अनेक वेळा लोक चहामध्ये किसलेले आले घालतात, यामुळे चहाही कडू होतो.
 • अनेकदा घरी चहा बनवताना वेळ वाचवण्यासाठी लोक पाणी आणि दूध एकत्र करतात आणि उकळल्यावर आले घालतात. पण, या प्रक्रियेत मसाले आणि चहा पावडर व्यवस्थित मिसळायला वेळ मिळत नाही.
 • चहा बनवताना आधी पाणी उकळून घ्या. पाणी उकळायला लागल्यावर प्रथम ठेचलेले आले व इतर मसाले घाला. त्यांना या पाण्यात किमान एक मिनिट उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांची चव चहामध्ये येईल. यानंतर या उकळत्या पाण्यात चहा पावडर टाका.
 • चहाच्या पावडरबरोबरच पुढच्या १० सेकंदात साखरही घाला. जर तुम्ही दुधात साखर घातली तर ते दूध पातळ करते.
 • चहा बनवताना तुमच्या लक्षात येईल की, अनेकदा चहा पावडर उकळताना भांड्याला चिकटून राहते. अशा परिस्थितीत, चमच्याच्या साहाय्याने आजूबाजूची चहा पावडर भांड्यात परत करणे महत्त्वाचे आहे.
  दूध घातल्यानंतर चहाला किमान दोन मिनिटे उकळवा आणि हे मध्यम आचेवर करा.

असा बनवा तुमचा चहा… (परफेक्ट चहा रेसिपी)

 • दोन कप चहा बनवायचा असेल तर एक कप उकळलेले दूध काढून बाजूला ठेवा.
 • यानंतर दोन कप चहासाठी भांड्यात दोन कप पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवा.
 • पाणी उकळल्यावर या उकळत्या पाण्यात ठेचलेले आले टाका. (तुम्ही मसाला चहा बनवत असाल तर तुम्ही वेलची, लवंगा किंवा इतर मसालेदेखील घालू शकता.)
 • हे पाणी किमान दोन मिनिटे उकळवा. या उकळत्या पाण्यात चहा पावडर घाला आणि पुन्हा दोन मिनिटे उकळा. त्यानंतर चहामध्ये साखर घाला.
 • यानंतर फ्रिजमधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेले दूध घाला. (एकदम फ्रिजमधून काढलेलं दूध घालू नका) मधोमध एका चमचाच्या मदतीने चहा ढवळत राहा.
 • दोन मिनिटे दुधात उकळल्यानंतर चहा गाळून घ्या.
  तुमचा परिपूर्ण चहा तयार आहे.