तूप हा आपल्या रोजच्या वापरातील पदार्थ आहे. तूप खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. डाळ भातापासून पुरळपोळीपर्यंत अनेक पदार्थांमध्ये तूप टाकून खाल्ले जाते. बाजारात तूप सहज मिळते पण घरी तयार केलेल्या तूपाला तोड नाही. आजही प्रत्येक घरामध्ये पारंपारिक पद्धतीनुसार लोणी कडवून तूप तयार केले जाते. घरच्या घरी तूप तयार करण्यासाठी दुधाची घट्ट साय बाजूला काढली जाते त्यात दह्याचे मुरवन लावतात. लोणी तयार करण्यासाठी हे साय रवीने फेटून घेतात किंवा मिक्सरमध्ये फिरवली जाते. त्यांनतर जे लोणी मिळते ते पाण्यात धूवून मग कडवले जाते. पण तुम्हाला माहितीये का तूम्ही पाणी वापरूनही तूप तयार करू शकता. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण ही ट्रिक अत्यंत उपयूक्त आहे.

तूप तयार केल्यानंतर त्यात असलेली बेरी आपण टाकून देतो पण त्याच बेरीमध्ये पाणी टाकून उकळवले तर त्यातील तूप आपल्याला मिळू शकते. पाणी वापरून तूप कसे तयार करायचे हे जाणून घ्या. युट्युबवर Cook With Parul या चॅनरवर ही ट्रिक सांगितली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की जसे आपण घरी तूप तयार करतो त्याप्रमाणे तूप कडवून घ्या. त्यानंतर त्याची बेरी वापरून त्यात पाणी टाकून तूप तयार करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुधाच्या सायीपासून तूप तयार करण्याची पद्धत

  • दुध उकळवून थंड करा आणि मग फ्रिजमध्ये ठेवा. घट्ट साय रोज बाजूला काढा.
  • ही साय फेटून न घेताच एका भांड्यात टाकून मंद आचेवर उकळवायला ठेवा.
  • साय विरघळू लागेल. गॅस अत्यंत मंद करून साय उकळवून घ्या. लाकडी चमच्याने ढवळत राहा.
  • उकळी येऊ लागल्याने
  • तूप वेगळे होऊन तळाशी बेरी जमा होईल जिचा रंग सोनेरी असेल.
  • बेरीचा रंग तपकिरी होईपर्यंत तुप कडवा.
  • त्यानंतर तूप गाळून बेरी वेगळी करा.

पाणी वापरून तूप कसे बनवावे

  • तूप तयार केल्यानंतर तुपाच्या भांड्यात बेरी तळाशी राहील.
  • त्यात दोन ग्लास पाणी टाका आणि चांगली उकळी येऊ द्या
  • बेरीतील तूप पाण्यामध्ये उतरेल त्यानंतर पुन्हा ते गाळून बेरी वेगळे करा.
  • आता तुपाचे अंश असलेले पाणी तुम्हाला मिळेल.
  • या पाण्यातून तूप वेगळे करण्यासाठी थंड करण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवा
  • तूप थंड झाल्यानंतर पाण्याच्या वर जमा होईल आणि ते घट्ट होईल.
  • तूप घट्ट झाल्यानंतर फ्रिजमधून काढा. चाकूने किंवा चमच्याने तूपाचा जाड थर काढू शकता.
  • अशा प्रकारे तुम्हाला पाण्यातून तूप वेगळे करता येईल.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)