जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर आपण सगळेच करतो. कंपनी आपल्या युजर्सच्या सोयीसाठी नव-नवे फीचर्स आणत असते. पण अनेकदा या फीचर्सचा वापर कसा करायचा याबाबत आपल्यालाच माहिती नसते. असंच एक फीचर म्हणजे डिलीट मेसेज फीचर. अनेकदा आपण चुकून एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट करतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. येथे आम्ही तुम्हाला डिलीट केलेला मेसेज कसा Recover करायचा यासाठी काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. पण, जर हा मेसेज बॅकअप घेतल्यानंतर आला असेल तर रिकव्हर करता येणार नाही हे लक्षात ठेवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसा रिकव्हर करायचा डिलीट मेसेज –
1.लोकल स्टोरेजसाठी
ही पद्धत केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी काम करते, iOS युजर्ससाठी नाही.
सर्वप्रथम फोनमध्ये फाइल मॅनेजर ओपन करा
येथे WhatsApp फोल्डरमध्ये जाऊन Database वर क्लिक करा
या फोल्डरमध्ये WhatsApp च्या सर्व बॅकअप फाइल असतात.
msgstore.db.crypt12 नावाच्या फाइलवर थोड्यावेळ प्रेस करा आणि नाव एडिट करा.
नवीन नाव msgstore_backup.db.crypt12 असं ठेवा. नवीन फाइल रिप्लेस होऊ नये यासाठी आपण नाव बदलावं.
आता सर्वात लेटेस्ट बॅकअप फाइलचं नाव msgstore.db.crypt12 असं ठेवा
आता गुगल ड्राइव्हमध्ये जा आणि आपले WhatsApp बॅकअप डिलीट करा
आता WhatsApp अनइंस्टॉल करा आणि परत इंस्टॉल करा
पुन्हा WhatsApp सुरू केल्यानंतर लोकल स्टोरेज बॅकअपसाठी तुम्हाला विचारलं जाईल.
येथे msgstore.db.crypt12 फाइल सिलेक्ट केल्यानंतर Restore वर टॅप करा
आता तुम्हाला तुमचा मेसेज मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to recover deleted messages on whatsapp sas
First published on: 07-01-2020 at 10:43 IST