Viral Video : आपले घर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आपण नियमित आपले घर स्वच्छ करतो. घरात होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण घरात कचरापेटी ठेवतो त्यात ओला आणि सुखा कचऱ्याची योग्य विल्हेवाट करतो पण तुमच्या कचरापेटीतून खूप दुर्गंध येतो का? जर हो, तर अशावेळी तुम्ही काय करता? कचरापेटीतून खूप दुर्गंध येत असेल आपण वारंवार कचरापेटी धुवून घेतो पण आता तुम्हाला असं करावं लागणार नाही. फक्त पाच रुपयांमध्ये तुम्ही हा त्रास कमी करू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, त्यासाठी तुम्हाला एक व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कचरापेटीतील दुर्गंध कसा घालवायचा, हे सविस्तरपणे सांगितले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले आहे की जेव्हा कचरापेटी रिकामी होते किंवा तुम्ही कचरापेटी स्वच्छ करता, तेव्हा कचरापेटीमध्ये बेकिंग सोडा टाका. त्यानंतर त्यावर वृत्तपत्र टाका आणि या वृत्तपत्राच्या वरती सुद्धा बेकिंग सोडा टाका. यामुळे कचरापेटीतून दुर्गंधी येणार नाही. कचरापेटीतून दुर्गंधी येऊ नये म्हणून ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा तुमची ही समस्या दूर करेन.

If you use tissue paper to soak excess oil from fried foods
तुम्हीही तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवता का? थांबा…डॉक्टरांनी सांगितला धोका
Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

हेही वाचा : Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम

याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा

हेही वाचा : Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कचरापेटीमध्ये फक्त एक गोष्ट टाका, दुर्गंध येणे बंद होईल” अनेक लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. तुम्ही सुद्धा हा भन्नाट जुगाड करू शकता आणि कचरापेटीतून येणाऱ्या दुर्गंधाच्या त्रासापासून वाचू शकता.