आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली त्वचा आहे. आपली त्वचा सूक्ष्मजीव, हानिकारक घटकांपासून आपले संरक्षण करते. तसेच शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणे व लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या दरम्यान तुम्ही त्वचेची काळजी घेताना कोणत्याही त्वचेसंबंधित प्रोडक्टचा वापर करताना आपली त्वचा कोरडी, तेलकट असे प्रकार ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी आपली त्वचा कशी आहे हे समजल्यावर तुम्ही त्वचेसंबंधित योग्य प्रोडक्ट वापरू शकाल. आता त्वचेचे प्रकार कसे ओळखावे  चला तर मग जाणून घेऊयात त्वचेचे विविध प्रकार कोणते आहेत?

तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार कसा ओळखणार?

– कोणत्याही टिश्यू पेपर वर ऑईल अथवा ड्राय फ्लेक्स नसतील तर तुमच्या त्वचा सामान्य अर्थातच नॉर्मल स्किन आहे. याचा अर्थ असा की, या टिश्यूवर तुम्हाला तेल नाही दिसणार आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे डाग दिसणार नाहीत. अशा त्वचेवर पोअर्स दिसत नाहीत आणि त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते. या टाईपच्या त्वचेला जास्त काळजी करण्याची गरज नसते आणि त्याशिवाय स्किन केअर रूटीन जे नेहमी केलं जातं ते यासाठी पुरेसं आहे.

– तुमच्या टिश्यूवर जर ऑईल असेल विशेषतः गाल, नाक आणि कपाळाच्या ठिकाणी तेल जमलेलं दिसलं तर तुमची त्वचा तेलकट आहे हे समजा. या स्किन टाईपमध्ये पोअर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि जास्त तेलामुळे त्वचा चमकते. पण त्वचेवर पिंपल्स येण्याचं हे मुख्य कारण असतं. अशी त्वचा नेहमी साफ ठेवणं अत्यंत गरेजचं आहे, जेणेकरून तुमच्या त्वचेवर तेल जमा होऊ नये. ऑईल फ्री स्किन प्रॉडक्ट्सचाच नेहमी तुम्ही वापर करणं गरजेचं आहे.

– तुमच्या टिश्यूवर जर डेड स्किनचे फ्लेक्स येत असतील तर तुमची त्वचा कोरडी आहे हे लक्षात ठेवा. धुतल्यानंतरही जर तुमची त्वचा ओढली जात असेल अथवा टाईट दिसत असेल. तर तुमची त्वचा कोरडी आहे. या त्वचेवर छोटे छोटे पोअर्स असतात. या त्वचेसाठी मॉईस्चरची खूपच आवश्यकता असते.

– तुमच्या T-zone अर्थात नाक आणि कपाळावर जर तेल जमा होत असेल आणि बाकी ठिकाणी जर ड्राय फ्लेक्स असतील तर तुमची त्वचा ही कॉम्बिनेशन स्किन आहे. हा स्किन टाईप दोन तऱ्हेचा असतो, एक म्हणजे ऑईली नॉर्मल आणि ऑईली ड्राय. अशा त्वचेवर वेगवेगळ्या तऱ्हेचे स्किन प्रॉडक्ट्स वापरणं गरजेचं आहे.

– संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) ही सर्वात जास्त त्रासदायक त्वचा असते. ही अडचण कोरड्या आणि तेलकट त्वचेच्या दोन्ही बाबतीत दिसून येते. अशा त्वचेच्या बाबतीत टिश्यूवर ड्राय फ्लेक्स येतात, त्वचा टाईट होते आणि रेडनेस, खाज आणि इरिटेशन असा त्रास सुरु होतो. वातावरणात बदल झाल्यावर आणि ब्युटी उत्पादनाच्या अलर्जिक रिअॅक्शन अशा नेहमी या त्वचेवर होत असतात. अशी त्वचा अतिशय डेलिकेट असून या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते.

– गर्भधारणे दरम्यान तसेच PCOS किंवा हायपरथायरॉईडिझम अशा अनेक कारणाने तुमच्या त्वचेचे प्रकार बदलू शकतात. त्याप्रमाणे तुम्ही चेहर्‍यावर प्रोडक्टचा वापर करावा.