scorecardresearch

डोळ्याच्या पिशव्यांमुळे चेहरा थकलेला दिसतो, ते दूर करण्यासाठी ‘या’ ५ घरगुती उपायांचा करा अवलंब

डोळ्यांच्या पिशव्यांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी नारळाचे तेल वापरा.

lifestyle
एसेन्शियल तेलाचा वापर करून तुम्ही डोळ्यांची सूज दूर करू शकता. (photo: pexels)

जेव्हा तुम्ही सकाळी उठता, बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा आरशात पाहता तेव्हा डोळ्यांखाली सूज दिसते. प्रत्यक्षात त्याला अंडरआइज बग्स म्हणतात. वाढत्या वयाबरोबर ही समस्या अधिक दिसून येते. डोळ्यांभोवती स्नायू आणि त्वचेच्या ऊतकांमध्ये कमी किंवा जास्त लवचिकतेमुळे हे होऊ शकते. सहसा ही समस्या तणाव आणि डिहायड्रेशनमुळे होते. यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो आणि डोळ्यांखाली पिशव्या तयार होतात. जर तुम्हाला सूज येण्याच्या समस्येचा देखील सामना करावा लागत असेल तर तुम्ही त्यांना कोणत्याही कॉस्मेटिकच्या मदतीशिवाय घरी कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे घरगुती उपायांबद्दल जे डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

टी-बॅग

यासाठी तुम्ही ग्रीन आणि ब्लॅक चहाच्या दोन्ही बॅग वापरू शकता. सर्वप्रथम गरम पाणी बनवा आणि त्यात दोन टी बॅग टाका. त्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यांना थोडे थंड होऊ द्या. या बॅगने तुमचे डोळ्यांना शेक द्या. त्यांना १५ सेकंदांसाठी डोळ्यांवर ठेवा. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवून कोल्ड कॉम्प्रेस देखील करू शकता. काही काळानंतर सूज कमी होण्यास सुरुवात होईल.

एसेन्शियल तेल

दरम्यान एसेन्शियल तेल त्वचा आणि नसापासून मुक्त होण्यास खूप मदत करते. तर तुम्ही या तेलाचा वापर करून तुम्ही डोळ्यांची सूज दूर करू शकता. डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी, एक थेंब लिंबू तेल आणि एक थेंब कॅमोमाइल तेलाचा, एक थेंब लॅव्हेंडर तेल घ्या. आता त्यांना चांगले मिक्स करा. त्यात पाण्याचे काही थेंब टाका आणि या मिश्रणाने डोळे आणि आजूबाजूच्या त्वचेला हलक्या हाताने मसाज करा. काही वेळातच तुमच्या डोळयांच्या पिशव्यांची समस्या कमी होण्यास सुरुवात होईल.

नारळाचे तेल

डोळ्यांच्या पिशव्यांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी नारळाचे तेल वापरा. तुम्ही 1 चमचे एक्स्ट्रा व्हर्जिन नारळाचे तेल घेऊन डोळ्यांवर लावा आणि अँटी-क्लॉक मोशनमध्ये हलक्या हाताने मसाज करा. रात्री झोपताना तुम्ही हे करा. आता ते रात्रभर असच डोळ्यांना लावून ठेवा. सकाळपर्यंत तुमच्या डोळ्यांना बऱ्याच प्रमाणात आराम आणि सूज कमी झाल्याचा दिलासा मिळेल.

थंड चमचा

डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी तुम्ही चमचा एक प्रयोग करू शकता. यासाठी ४ ते ५ चमचे घ्या आणि काही तास फ्रीजमध्ये ठेवा. आता हे थंड चमचे फ्रीज मधून काढून बंद डोळ्यांवर ठेवा. याने तुम्हाला खूप विश्रांती मिळेल.

बेकिंग सोडा

तुम्ही एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि ते १ कप पाण्यात मिसळा. आता या सोल्यूशन मध्ये कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवा. सुमारे १० ते १५ मिनिटांनंतर त्यांना काढून टाका आणि पुन्हा करा. असे केल्याने देखील तुमच्या डोळ्यांची समस्या दूर होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2021 at 17:48 IST
ताज्या बातम्या