लग्न हा दोन व्यक्तींमधील सर्वार्थाने बांधिलकीचा विषय असतो. लग्नाच्या सोहळ्याचीच नाही, तर पुढील आयुष्याचीही योग्य पद्धतीने तयारी करावी लागते. म्हणूनच, जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर ते पाऊल उचलण्याआधी आपण आर्थिक गोष्टींचे काय नियोजन केले आहे याचा विचार करा. दोन्ही जोडीदारांमध्ये भावनिक सौख्यासोबतच आर्थिक सौख्य असणेही तेवढेच महत्वाचे असते. त्यामुळे लग्न करण्याआधी खालील काही आर्थिक बाबी तपासून बघणे महत्त्वाचे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपली आर्थिक स्थिती पाहा: तुमच्या भावी जोडीदाराला तुमची आर्थिक परिस्थिती सविस्तर सांगा. यापैकी कुठलीही गोष्ट लपविल्याने पुढील आयुष्यात अडचणीचा प्रसंग येऊ शकतो. एकमेकांची आर्थिक परिस्थिती माहीत असल्याने जोडप्याला भविष्यातील खर्चांसाठी नीट नियोजन करणे सोपे जाते.

आपल्या कर्जांचा, बंधनांचा आणि दायित्वांचा तपशील शेअर करा: साधारणपणे लोक आपले दायित्व लपवतात आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्याचे दर्शवतात. अशाने नवीन नात्यात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असते. तुमचे कर्ज, इतर बंधने यांच्यामुळे जोडीदाराला लग्नानंतर आश्चर्य होता कामा नये. स्वतःवर कर्ज असणे ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही. मात्र, त्याबाबत जोडीदाराला वेळीच कल्पना द्या.

आपल्या बँक खात्याचा तपशील शेअर करा: होणाऱ्या जोडीदारासोबत सर्व बँक खात्यांचा तपशील शेअर केल्याने त्यांना कळेल की आर्थिक व्यवहार कसे पसरलेले आहेत. तसेच जर तुमच्या जोडीदाराचे खाते नसेल तर तुम्ही त्याचे खाते उघडू शकता किंवा संयुक्त खाते उघडू शकता. अशाने दोघांना बचत आणि खर्च यांचा अंदाज येईल.

योग्य गुंतवणूक सुरू करा: एकटे असताना तुम्ही गुंतवणूक सुरू केलेली नसेल किंवा फक्त परतावा देणाऱ्या विमा पॉलिसी घेतल्या असतील. लग्नानंतर तुम्हाला नीट गुंतवणूक सुरू केली पाहिजे. जेणेकरून भविष्यातील खर्चांची तरतूद होईल. तुम्ही जोखमींसाठी आयुर्विमा पॉलिसी किंवा आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकता.

योग्य गुंतवणूक सुरू करा: एकटे असताना तुम्ही गुंतवणूक सुरू केलेली नसेल किंवा फक्त परतावा देणाऱ्या विमा पॉलिसी घेतल्या असतील. लग्नानंतर तुम्हाला नीट गुंतवणूक सुरू केली पाहिजे. जेणेकरून भविष्यातील खर्चांची तरतूद होईल. तुम्ही जोखमींसाठी आयुर्विमा पॉलिसी किंवा आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकता.

आर्थिक छळापासून बचाव: तुम्ही सावधपणे खर्च करीत असलात तरी तुमच्या जोडीदाराचे खर्च तुमच्यापेक्षा जास्त असू शकतात. दोघांनी मिळून पालन करण्याचे आर्थिक नियम घालणे किंवा बजेट करणे अशी कामे करणे सुज्ञपणाचे ठरेल. अशाने दोघांचाही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही अविचारी खर्च टाळण्यासाठी प्रत्येक खर्चासाठी सुद्धा बजेट तयार करू शकता.

भावनात्मक प्रगल्भतेसोबतच आर्थिक सुरक्षासुद्धा जोडप्यांसाठी आनंदी वैवाहिक जीवनासाठी चर्चेचा विषय असतो ज्याने अकारण भांडणे टाळली जाऊ शकतात.

आदिल शेट्टी, सीईओ, बँकबझार

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are getting married take care of your financial managements
First published on: 02-12-2017 at 16:26 IST