ऑक्टोबर महिना म्हणजे उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे त्वचेला होणारा त्रास. मात्र कडक उन्हापासून आपल्या त्वचेचा बचाव करायचा असेल तर सनस्क्रीन लोशन लावणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचा अंश आणि तेल शोषून घेतले जाते. परंतु उन्हामुळे होणारा हा त्रास सनस्क्रीनमुळे कमी होतो. उन्हामुळे चेहऱ्यावर तसेच हातांवर काळे डाग येणे, रॅश आल्यासारखे दिसणे यांसारखे परिणाम दिसून येतात. मात्र सनस्क्रीन लोशन लावल्याने त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. बाजारात सध्या सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु असलेली पाहायला मिळते. त्यामुळे त्यातले नेमके कोणते उत्पादन निवडायचे असा प्रश्न सामान्य ग्राहकांना नकळतच पडतो. आपल्या त्वचेला उपयुक्त आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने सनस्क्रीन लावलेले केव्हाही चांगले. तर सनस्क्रीन लोशन लावताना कोणती काळजी घ्यावी याच्या मानसी जैन यांनी दिलेल्या काही खास टिप्स…

सनस्क्रीन लोशनचा जाड थर लावा

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

सनस्क्रीन लावणे ही केवळ औपचारिकता न करता त्याचा त्वचेवर जाड थर लावा. एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन लोशन निवडा. सगळीकडे समप्रमाणात सनस्क्रीन लोशन लावा. चेहऱ्याची त्वचा उन्हामुळे खराब होऊ नये म्हणून त्याला किमान एक टेबलस्पून इतके सनस्क्रीन लोशन लावा. एसपीएफ कमी असलेले सनस्क्रीन लोशन घेतल्यास त्याचा म्हणाावा तितका फायदा होत नाही.

सनस्क्रीन चेहऱ्यावर थेट लावा

सामान्यपणे आपण कोणतेही क्रीम किंवा लोशन लावताना ते हातावर घेतो. हात एकमेकांवर घासतो आणि मग ते लावतो. मात्र सनस्क्रीन असे लावू नये. ते थेट चेहऱ्यावर लावावे. असे केल्याने त्यामध्ये असणारे घटक त्वचेमध्ये योग्यपद्धतीने मिसळले जातील आणि चेहऱ्याचे चांगल्या पद्धतीने संरक्षण होईल.

एसपीएफ योग्य आहे ना ते तपासून पाहा

सनस्क्रीन लोशन चेहऱ्याला लावल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसायला काही वेळ लागतो. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे संरक्षण व्हायचे असल्यास किमान ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन लोशन लावावे. ३० एसपीएफ असलेल्या लोशनमुळे चेहऱ्याचे १० तासांसाठी रक्षण होते तर ५० एसपीएफ असलेल्या सनस्क्रीन लोशनमुळे चेहरा १५ ते १६ तासांसाठी सुरक्षित राहतो.

बाहेर जाण्याच्या आधी सनस्क्रीन लावा

सनस्क्रीन लोशनचा प्रत्यक्ष परिणाम दिसण्यास वेळ लागत असल्याने ते बाहेर पडण्याच्या काही वेळ आधीच लावणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही बाहेर पडल्यानंतर त्याचा योग्य तो उपयोग होऊन त्वचा सुरक्षित राहील. याशिवाय आधी सनस्क्रीन लावून मग त्यावर मॉयश्चरायझर लावले तर चालू शकते.

नैसर्गिक सनस्कीन लोशनला प्राधान्य द्या

बाजारात कायमच सौंदर्य उत्पादनांमध्ये जोरदार स्पर्धा असते. तशीच सनस्क्रीन लोशनच्या बाबतीतही आहे. मात्र कृत्रिम उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उत्पादने वापरणे केव्हाही चांगली. सनस्क्रीनच्या बाबतीत कोरफडीचे जेल, चंदन, गुलाब आणि यांसारखी अनेक नैसर्गिक घटकांनी युक्त सनस्क्रीन लोशन मिळतात. त्यांचा विचार केलेला कधीही चांगला.