आपल्यातील अनेकजण अगदी लहान लहान गोष्टीही सहज विसरतात. यामध्ये व्यक्तीच्या नावांचा किंवा इतरही अनेक संदर्भांचा समावेश असतो. परंतु असे होऊ नये आणि मेंदूने तल्लखपणे कार्य करावे यासाठी शरीरातील काही क्रिया योग्य पद्धतीने होण्याची आवश्यकता असते. गोष्टीं वारंवार विसरणे ही काही काळाने गंभीर समस्या होते आणि त्याला आपण स्मृतीभ्रंश म्हणतो. मेंदूतील विशिष्ट पेशी मृत झाल्याने हा त्रास उद्भवतो. यामुळे विसरणे, बौद्धिक गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होणे आणि स्मृतीभ्रंश होणे असे परिणाम दिसून येतात. परंतु असे होऊ नये यासाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता असते. पाहूयात काय आहेत हे उपाय…

कामाचे स्वरुप बदला

Lakshmi Narayan Yog
Lakshmi Narayan Yog : लक्ष्मीनारायण योग तयार झाल्याने ‘या’ राशींना मिळणार छप्परफाड पैसा, अचानक होणार धनलाभ
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

अनेकदा आपण आपल्या दिवसाची सुरुवात एकाच पद्धतीने करतो. मात्र त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात तोच तोचपणा येतो. नियमित वेळी नियमित गोष्टी करणे, एकाच मार्गाने बाहेर जाणे आणि नेहमीचाच दिनक्रम ठेवणे यामुळे तुम्ही कंटाळता. ओळखीच्या गोष्टी करणे हे कायमच सोपे असते. पण यामध्ये काही प्रमाणात बदल करणे आवश्यक असते. त्यामुळे तुमचा ऑफीसला किंवा इतरठिकाणी जाण्याचा मार्ग बदलणे यांसारखे लहान बदलही मेंदुला अॅक्टीव्ह ठेऊ शकतात.

ताणाचे योग्य पद्धतीने नियोजन करा

विविध गोष्टींचा ताण आपल्या डोक्यावर सातत्याने येत असतो. मध्यमवयीन महिलांमध्ये ताणाचे प्रमाण जास्त असते तसेच त्यांना अल्झायमर होण्याचाही धोका जास्त असतो असे एका अभ्यासावरुन समोर आले आहे. सध्याचा आयुष्याचा वेग पाहता ताण असणारच मात्र त्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. ते केल्यास तुम्ही अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.

नेहमीच्या हाताचा वापर न करता केस विंचरा अथवा दात घासा

केस विंचरणे अथवा दात घासण्यासाठी सामान्यत: उजव्या हाताचा वापर केला जातो. यात बदल करून डाव्या हाताचा वापर सुरू करावा. सुरुवातीला हे काहीसे विचित्र वाटेल. पण यामुळे मेंदुला नव्याने सुचना ज्ञात कराव्या लागतील, परिणामी त्याला नेहमीच्या सवयीचा मार्ग सोडत नव्याने सूचनांची नोंद करावी लागेल. हा प्रयोग मेंदुची कार्यक्षमता सुधरवण्यास फायदेशीर ठरू शकतो. डावखुऱ्या लोकांनी उजव्या हाताचा वापर सुरू करावा.

मित्रमंडळींबरोबर सक्रीय राहा

मित्रमंडळींबरोबर सक्रीय राहणे हे तुमच्या मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही सामाजिक स्तरावर जितके सक्रीय राहाल तितके जास्त चांगले. त्यामुळे मेंदूला एकप्रकारचा व्यायाम होतो आणि त्याचे कार्य सुधारते. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मेंदू जास्त कार्यक्षम होण्यास मदत होईल.

पुस्तके वाचा, टिव्ही पाहण्यापासून ब्रेक घ्या

वाचन हे मनाला ताजेतवाने करण्याचा एक उत्तम उपाय आहे. नवनवीन वाचत राहील्यास तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. सतत टिव्ही पाहणे हे काही वेळाकरता आराम देऊ शकते. मात्र सातत्याने टिव्ही पाहणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे टिव्हीपासून ब्रेक घ्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)