Foods To Tighten Loose Skin: वाढत्या वयानुसार आपलंही सौंदर्य वाढावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण अनेकदा वयाची तिशी, चाळिशी ओलांडल्यानंतर चेहऱ्यावरची चमक कमी होऊन त्वचा सैल दिसू लागते. परंतु, पोषक आहाराच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सौंदर्य टिकवून ठेऊ शकता. यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा.

व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ

तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांना सहभागी करू शकता. खरं तर यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे मुक्त रेडिकल्स कमी करतात. यासाठी तुम्ही लिंबू, आवळा, संत्री, पेरू आणि पपई यांसारखी फळे खाऊ शकता.

कोलेजनयुक्त पदार्थ

कोलेजन त्वचेला मजबूत आणि घट्ट करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. वाढत्या वयानुसार त्याची पातळी कमी होऊ लागते. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात अंडी, चिकन, मासे, हिरव्या पालेभाज्या, काजू आणि बिया यांचा समावेश करू शकता. हे त्वचा तरुण ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

शरीर हायड्रेटेड ठेवा

तुमचे शरीर तंदुरुस्त आणि तरुण ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान दोन-तीन लिटर पाणी पायल्या हवे. तुम्ही ग्रीन टीदेखील घेऊ शकता. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या आहारात कोरडे पदार्थ समाविष्ट करा

त्वचा घट्ट आणि तरुण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात कोरडे पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. सुक्या मेव्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे त्वचेची खोलवर दुरुस्ती करतात आणि ती निरोगी ठेवतात. तुम्ही त्यात बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता यांचा समावेश करा.