जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये आणि पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता तुम्ही या दोघांच्या बँकिंग सेवा एकाच अ‍ॅपवर वापरु शकणार आहात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि टपाल विभाग (डीओपी) यांनी मंगळवारी नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाकपे’ (DakPay) लाँच केलं. DakPay अ‍ॅप एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले, यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही वापरता येतील. गुगल प्ले-स्टोअरवरुन हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. डाउनलोड केल्यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि पिन कोड टाकून अ‍ॅपमध्ये प्रोफाइल बनवावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचं बँक अकाउंट अ‍ॅपसोबत लिंक करु शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त बँकही लिंक करु शकतात. यानंतर युपीआय किंवा अन्य प्रकारे मनी ट्रान्सफर करता येईल. या अ‍ॅपमध्येही युपीआय अ‍ॅपप्रमाणे चार अंकी पिन नंबर क्रिएट करावा लागेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India post payments bank launches digital payment app dakpay check details sas
First published on: 16-12-2020 at 10:29 IST