Filter Coffee Recipe: कॉफी प्रेमींसाठी आजची सकाळ गोड करणारी एक माहिती सध्या समोर येत आहे. टेस्ट ऍटलस या जगप्रसिद्ध फूड गाईडतर्फे जगातील सर्वोत्कृष्ट अशा १० कॉफींची यादी जाहीर करण्यात आली ज्यामध्ये भारतीय फिल्टर कॉफीला दुसऱ्या क्रमांकाची बेस्ट कॉफी म्हणून गौरवण्यात आले आहे. प्रथम क्रमांकावर क्युबा मधील कॅफे क्युबानो असून त्याखालोखाल पाच पैकी ४.५ स्टार मिळवून फिल्टर कॉफीने बाजी मारली आहे. हिल्टन गार्डन इन, नवी दिल्ली येथील कार्यकारी शेफ, बिस्वरूप चॅटर्जी, यांनी या घोषणेनंतर इंडियन एक्सस्प्रेससह संवाद साधताना फिल्टर कॉफीची काही खास वैशिष्ट्य सांगितली आहेत. ते म्हणतात की, भारतीय फिल्टर कॉफी ही कॉफी बीन्ससह दक्षिण भारतातील काही खास रोपांच्या मिश्रणाने तयार केली जाते त्यामुळे याची चव व गंध हा वेगळा ठरतो. यामध्ये मध्ये अरेबिका, रोबस्टा किंवा चिकोरीच्या मिश्रणाने कडूपणा वाढवला जातो. मंद आचेवर डार्क रोस्ट करताना या कॉफीवर प्रचंड मेहनत घेतली जाते.

दिल्ली एनसीआर मधील रॅडिसन ब्लू कौशांबी मधील क्लस्टर एक्झिक्युटिव्ह शेफ, धीरज माथूर, यांनी IE ला सांगितल्याप्रमाणे, फिल्टर कॉफी किंवा ‘फिल्टर कापी’ तयार करण्याबरोबरच सर्व्ह करण्याची पद्धत सुद्धा खास आहे. जी वर्षानुवर्षे पाळली गेली आहे. आज आपणभारतीय फिल्टर कॉफी बनवण्यासाठी शेफ माथूर यांनी सांगितलेली सामग्री व कृती पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी भारताच्या या जगात गाजलेल्या फिल्टर कापीचा आस्वाद घेऊ शकाल.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

साहित्य

  • कॉफी पावडर: डार्क रोस्ट (भाजलेल्या) कॉफी बीन्सचे मिश्रण, विशेषतः फिल्टर कॉफी बनवताना कॉफीसह चिकोरीच्या पानांचे मिश्रण सुद्धा वापरले जाते हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार 80:20 किंवा 70:30 असू शकते. ऑनलाईन किंवा बाजारात सुद्धा ही चिकोरीची पाने उपलब्ध होतात.
  • पाणी
  • दूध
  • साखर (पर्यायी)

कृती

  • फिल्टरच्या वरच्या कपमध्ये २ ते ३ चमचे कॉफी पावडर घाला.
  • चमचा वापरून कॉफी पावडर हलक्या हाताने टँप करा, ज्याप्रमाणे आपल्या कॉम्पॅक्ट पावडरच्या डब्यात पावडर सपाट करून भरली जाते त्याप्रमाणे ही कॉफी सेट करा
  • मग या कॉफी पावडरवर गरम पाणी घाला. हे पाणी कॉफीमधून खालच्या कपमध्ये झिरपू द्या.
  • खालच्या कपमध्ये गोळा झालेले कॉफीचे पाणी वेगळे काढून घ्या.
  • तुमच्या आवडीनुसार प्रमाणात दूध गरम करा. एका साध्या ग्लासमध्ये दूध घेऊन चमच्याने (किंचित वेगाने) फेटून घ्या यामुळे दुधाचा पोत छान फेसाळ आणि घट्ट होतो. तुम्हाला हवे असल्यास यावेळी साखर घालू शकता.
  • मग तुम्हाला कॉफी जितकी स्ट्रॉंग हवी त्यानुसार दूध मिसळून घ्या.
  • हे मिश्रण करताना चमच्याने ढवळण्यापेक्षा एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात ओतून मिसळा ज्यामुळे चव खुलून येण्यास मदत येईल.

हे ही वाचा<< Video: वाटीभर मूग डाळीत बनवा कुरकुरीत सँडविच; ब्रेडविना करा भरपूर प्रोटीनयुक्त रेसिपी, एकातच पोट भरेल

जर तुम्हीही कॉफी प्रेमी असाल तर तुम्हाला ही रेसिपी एकदा तरी करून पाहायला हवी, आणि हो कशी होते हे कमेंट करून नक्की कळवा .