Health Special संप्रेरकांचे असंतुलन आणि त्यासाठी अत्यंत कल्पक वेष्टनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चहा, काढे, गोळ्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या सगळ्यात “इंग्रिडिएंट लिस्ट ” अर्थात हे सगळे पदार्थ कशाने तयार करण्यात आले आहेत याचा जवळून अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, हे सगळं आपल्या आजूबाजूलाच आहे मात्र आपण नित्यनियमाने त्यांचा आहारात समावेश करत नाही.

एखाद्या स्त्रीला अमुक औषधाने फरक पडला मात्र हेच औषध दुसऱ्या स्त्रीसाठी परिणामकारक ठरेल असं होत नाही. आज याच विषयावर आणखी जाणून घेऊयात . स्त्रियांच्या शरीरात विविध संप्रेरके वेगेवेगळ्या प्रकारे कार्यरत असतात. त्यांच्या आहार विहारावर या संप्रेरकांचे संतुलन अवलंबून असते .

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
Can these yoga asanas lower your stress levels
डोके आणि मन शांत ठेवण्यासाठी ‘ही’ दोन योगासने उपयुक्त; रोज ३० ते ९० सेकंदाचा सराव केला तरी होईल स्ट्रेस कमी
consuming your meals on selected time or when you hungry which method is beneficial for you read expert advice
भूक लागली तरीही तुम्ही ठरलेल्या वेळेतच जेवता का? जेवणाची योग्य वेळ कशी ठरवायची? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात…
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

हेही वाचा : भूक लागली तरीही तुम्ही ठरलेल्या वेळेतच जेवता का? जेवणाची योग्य वेळ कशी ठरवायची? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात…

नियमित व्यायाम, पोषक आहार आणि योग्य प्रमाणात विश्रांती घेतल्यास शरीरातील संप्रेरके आनंदाने नांदत असतात. मात्र जर आहार कुपोषित असेल, दिनचर्या आळसावलेली असेल, झोपेच्या वेळा अनिश्चित असतील, मानसिक ताण असेल तर या संप्रेरकांचे संतुलन बिघडू शकते आणि अर्थात त्याची लक्षणे ठळकपणे दिसू लागतात. त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास संप्रेरकांचे संतुलन राखणे सोपे जाऊ शकते. सुरुवातीला या समस्याची लक्षणे जाणून घेऊ!

  • थकवा येणे
  • वैचारिक अस्थिरता जाणवणे
  • लक्ष केंद्रित करणे अवघड वाटणे
  • चेहऱ्यावर विशेषतः हनुवटी आणि गाळाच्या खालच्या हाडावरील भागावर मुरुमे येणे
  • वजन वाढणे
  • केस पातळ होणे/ केस वाजवीपेक्षा जास्त गळणे
  • त्वचा कोरडी होणे
  • मानसिक अस्वास्थ्य
  • सतत चिंतातुर असणे
  • निद्रानाश
  • वंध्यत्व येणे
  • अनियमित मासिक पाळी
  • पोटात वारंवार दुखणे
  • अकारण डोकेदुखी
  • स्वभाव लहरी होणे

हेही वाचा : Health Special: स्लीप अ‍ॅप्नीया – झोपेत असा श्वास अचानक का थांबतो? किती गंभीर आहे ही समस्या?

आहारातील ठराविक पदार्थ वरील लक्षणांपासून स्त्रियांना मुक्त करू शकतात

संप्रेरकांशी संबंधित कोणत्याही समस्यांसाठी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे; प्रत्येक संप्रेरक हे प्रथिने आणि स्निग्धांशानी तयार झालेले असते. त्यामुळे आहारातील प्रथिनांचे प्रमाण सुधारणे संप्रेरकांच्या समस्यांवर परिणामकारक ठरू शकते. अशाच काही अन्नपदार्थांबद्दल थोडं जाणून घेऊ.

अंड

प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे यांनी भरपूर असणारं अंड आहारात समाविष्ट केल्याने अनेक स्त्रियांमध्ये चयापचय क्रिया सुधारल्याचे तसेच संप्रेरकांचे संतुलन पूर्ववत झाल्याचे आढळून आले आहे

मासे

मांसाहार करणाऱ्यांसाठी समुद्री मासे अत्यंत उपायकारक आहेत. यातील कॅल्शिअम, ओमेगा -३ स्निग्धांश आणि प्रथिने संप्रेरकांसाठी उत्तम परिणाम देतात

फळभाज्या

भारतीय स्वयंपाकघरात विशेष लोकप्रिय नसणाऱ्या कोबी, भेंडी, दुधी यासारख्या भाज्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. शरीरात भुकेच्या संप्रेरकांवर उत्तम अंकुश ठेवतात, तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखतात. मात्र या भाज्या चिरून धुणे टाळावे. त्यातील पोषणघटकांचे प्रमाण उत्तम राहावे यासाठी या भाज्या धुवून नंतर चिराव्यात आणि शक्यतो वाफेवर शिजवाव्यात. यामुळे पोषकतत्त्वे आणि चव दोन्ही उत्तम राहतात

हेही वाचा : उन्हाळ्यात घरच्या घरी तयार केलेले दही का खावे? जाणून घ्या, घट्ट दही घरी कसे बनवावे?

आवश्यक स्निग्ध पदार्थ

वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया “फॅट फ्री” किंवा “लो फॅट” आहार घेण्याच्या मोहापायी आवश्यक स्निग्ध पदार्थ अत्यल्प स्वरूपात आहारात समाविष्ट करतात. कधी कधी कोलेस्टेरॉलच्या भीतीने देखील आहारातील तेलाचे प्रमाण अत्यल्प करतात. फॅट्सची कमतरता कोरडी त्वचा, केसगळती,लहरी स्वभाव होणे या समस्या जोपासत हळूहळू संप्रेरकांवर देखील उलट परिणाम करते. त्यामुळे स्त्रियांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहारात तेलबिया, तेल तूप यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. तूप, बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया यासारखे पदार्थ आहारात आवर्जून समाविष्ट करावेत.

पालेभाज्या

भारतात उत्तम प्रमाणात वेगवगेळ्या पालेभाज्या मिळतात. अलीकडे घरगुती पद्धतीने पालेभाज्या उगवण्याचं प्रमाण देखील वाढलेले आहे. नियमितपणे वेगेवेगळ्या पालेभाज्या आहारात समाविष्ट करणे संप्रेरकांची वरदान ठरू शकते. पालेभाज्यांतील लोह, मॅग्नेशिअम यासारखी पोषकघटक स्त्रियांच्या पचनसंस्थेला अत्यंत पोषक आहेत.

दालचिनी

पिण्याच्या पाण्यात १ इंच दालचिनीचे खोड ठेवून देणे आणि हे पाणी नियमितपणे प्यायल्याने संप्रेरकांच्या असंतुलनामुळे येणारी मुरुमे, त्वचेचे विकार कमी होतात. याशिवाय शरीरात इन्सुलिन चे प्रमाण पूर्ववत होण्यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारी आहे .

हेही वाचा : तुम्हीही झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारताय? ही सवय ठरू शकते हानिकारक! डॉक्टरांनी दिलाय सल्ला

बडीशेप

केसगळती पासून ते वजन कमी करण्यापर्यंत प्रत्येक समस्येसाठी बडीशेप हा उत्तम उपाय आहे. एक चमचा बडीशेप पाण्यात भिजवून ते पाणी पिणे किंवा त्याची पावडर करून ती जेवणातून घेणे यामुळे स्त्रियांना उत्तम परिणाम मिळतात . जेवणाआधी बडीशेपेचे पाणी पिणे चयापचयाचा वेग सुधारू शकते. पोटाचे आरोग्य उत्तम राखताना बडीशेपचे नियमित सेवन संप्रेरकांची देखील योग्य काळजी घेऊ शकते.

धणे / धने

भारतीय स्वयंपाकामध्ये नियमितपणे वापरले जाणारे धने/ धणे स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ज्यांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी आवर्जून आहारात किमान १ चमचा धणेपूड नियमित समाविष्ट करावी. विशेषतः मासिक पाळी दरम्यान पोटदुखी असणाऱ्या मुलींसाठी आणि महिलांसाठी धणे उकळून किंवा रात्रभर भिजवून ठेवलेलं पाणी प्यायल्याने आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यात धणे, पुदिना आणि काकडी असे मिश्रण करून ते पाणी सातत्याने पीत राहावे पोटाचे आणि पर्यायाने मनाचे आरोग्य उत्तम राहते.