इन्स्टाग्राम हे फोटोशेअरिंग अॅप अल्पवाधितच लोकप्रिय झालं. फक्त फोटो शेअरिंग एवढाचा मर्यादीत वापर या अॅपचा न राहता व्यावसायिक कारणासाठीदेखील इन्स्टानं तरुण उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. याच इन्स्टाग्राममुळे अनेक ब्लॉगरही हिट झाले. फूड, ट्रॅव्हल, फॅशन अशा ब्लॉगर्सनां इन्स्टानं इतर सोशल मीडियाच्या तुलनेत वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्राम ही कंपनी फेसबुकशी जोडली गेल्यानंतर या अॅपमध्ये युजर्सनां फायदेशीर ठरलीत असे अनेक बदल करण्यात आले. आता येत्या काही आठवड्यात इन्स्टाग्राम पुन्हा एकदा आपला चेहरा मोहरा बदलणार आहे. युजर्ससाठी हे अॅप वापरणं किंवा प्रोफाइलला भेट देणं अधिक सोप्पं जावं यासाठी इन्स्टाग्राम काही बदल करणार आहे.

प्रोफाइल सेटिंगसमध्ये हे बदल होणार असून, युजर्स किंवा एखाद्या पेजशी अधिक सोप्या पद्धतीनं संपर्क साधता यावा यासाठी हे बदल करण्यात आले आहे. यासाठी प्रोफाईलमध्ये विशिष्ठ टॅब आणि आयकॉन अॅड करता येणार आहे. ई-मेल, फोन, मेसेज अशा विविध माध्यमातून युजर्सशी संपर्क साधण्याकरता वेगवेगळ्या टॅब इन्स्टाग्राम देणार आहे. सध्या याचं टेस्टिंग सुरू असून लवकरच युजर्सनां त्याच्या इन्स्टाग्राममध्ये बदल दिसणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram announced that personal profiles will soon be rearranged
First published on: 23-11-2018 at 13:24 IST