International Women Day 2024 : दरवर्षी ८ मार्चला जागतिक पातळीवर महिला दिन साजरा केला जातो. समाजातील स्त्रियांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करुण देणे, त्यांचा आदार आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महिला असणे हा शाप नसून वरदान आहे, हेही आज महिलांना सांगण्याची गरज आहे. महिलांच्या त्यांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे, त्यांच्यामध्ये किती क्षमता आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे किती महत्त्व आहे व्यक्त करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. तुम्हाला लहानाचे मोठे करणाऱ्या, तुमच्या आयुष्यात नेहमी तुमची साथ देणाऱ्या, तुम्हाला समजून घेणाऱ्या तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचे आभार आणि कृतज्ञता आज तुम्ही व्यक्त करू शकता. मग भलेही ती तुमची आई असो, बहिण असो किंवा पत्नी व मैत्रिणी….आजच्या दिवशी त्यांच्यासाठी खास काहीतरी करू शकता.

आयुष्यातील महिलांसाठी आजचा दिवस कसा खास करू शकता

आधार द्या आणि सन्मान करा

सर्वात पहिले आणि सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांना आधार द्या आणि आदर व्यक्त करा. तुमच्या आयुष्यातील महिलांना त्यांचा अस्तित्वाचे महत्त्व पटवून द्या. तुमच्या आयुष्यात त्या किती महत्त्वाच्या आहेत हे सांगा. तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहात हे सांगा. तुमच्या आयुष्यातील महिलांना आधार द्या. तुमचा थोडासा आधारा आणि सन्मान महिलांना आत्मविश्वास आणि भरपूर आनंद देऊ शकतो.

Why voter turnout in politically conscious Maharashtra remains low
त्यांनी करायचं ते केलं, आता आपण मतदानातून करायला हवं ते करू या…
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
15th April Panchang rashi bhavishya Family happiness to sudden wealth gain zodiac signs For marathi horoscope
१५ एप्रिल पंचांग: कौटुंबिक सौख्य ते अचानक धनलाभ; मेष ते मीन ‘या’ राशींच्या आयुष्यात आज नवं काय घडणार?
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?

वेळ द्या

जर तुमच्या आयुष्यातील महिलांसाठी काही खास करायचे असेल तर आज त्यांना तुमचा वेळ द्या. तुमच्या आयुष्यातील खास महिलांसह वेळ घालवा. त्यांना काय हवे आहे, नको आहे ते जाणुन घ्या. त्यांची छंद काय आहेत, त्यांच्या इच्छा काय आहेत आणि त्यांचे ध्येय काय आहे हे त्यांना विचारा. तुमच्यासह मनातील गोष्टी बोलून त्यांना खुप छान वाटेल.

हेही वाचा – चुलीनेच दिली ओळख! जेवण बनवून लोकांची प्रेरणा बनलेल्या ‘या’ मराठमोळ्या अन्नपूर्णा! कसा होता त्यांचा प्रवास

एक वेगळा आणि चांगला अनुभव द्या

महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास महिलांना एक वेगळा आणि चांगला अनुभव द्या. एका वेगळा उपक्रम, एखादे वेगळ्या ठिकाणी भेट द्या. त्यांच्यासह प्रवास करा. सायकल चालवा, त्यांच्यासह चित्रपट पाहायला जा. रोजच्या धावपळीतून त्यांना एक दिवसा आराम द्या आणि त्यांच्यासाठी काहीतरी खास करा.

कौतुक करा आणि प्रेरणा द्या

तुमच्या आयुष्यातील महिलांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक करा आणि त्यांना प्रेरणा द्या. त्यांच्या सकारात्मक क्षमता ओळखा आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करा.

हेही वाचा – Women’s Day 2024 : मासिक पाळीबाबत महिला गूगलवर सर्च करतात हे प्रश्न; डॉक्टरांनी दिली उत्तरे

एक छान भेट द्या

कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी, तुमच्या महिलांना एक खास भेट देऊन त्या किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव करून द्या. ही छोटीशी गोष्ट असू शकते, पण तुम्ही त्यांच्यासाठी खास काहीतरी करत आहात ही भावना त्यांना खूप आनंद देऊ शकते.

आरोग्याची काळजी घ्या

महिला नेहमी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य करतात. पण तुमच्या आयुष्यातील महिलांची काळजी तुम्ही घेऊ शकता. त्यांचे नियमित हेल्थ चेक अप करा. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या

हेही वाचा – Women’s Day 2024 : मासिक पाळीबाबत महिला गूगलवर सर्च करतात हे प्रश्न; डॉक्टरांनी दिली उत्तरे

आवडी-निवडी सांभाळा

कोणत्याही स्त्रीला तिच्या आवडी-निवडी समजून घेतल्या आणि तिच्या आवडी-निवडींची काळजी घेतली तर खूप आनंद होतो. मग भले ती तुमची आई असो बहिणी किंवा पत्नी असो, प्रत्येक काम संपूर्ण कुटुंबाच्या आवडी-निवडी लक्षात घेऊनच करतात. पण तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांच्या आवडीनिवडी चांगल्या प्रकारे माहीत आहेत का? त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी काही केले तर तुम्ही त्यांना खास वाटू शकते.

निर्णयाचे समर्थन करा.

भारतात, बहुतेक स्त्रिया त्यांच्या आयुष्याशी संबंधित निर्णय स्वतः घेत नाहीत, परंतु त्यांना निश्चितपणे पुरुषांची परवानगी असते. स्वावलंबी महिलांची स्थितीही अशीच आहे. महिलांना त्या पुरुषांपेक्षा कमी नाही हे जाणवण्यासाठी, त्यांना निर्णय घेण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांच्या निर्णयांमध्ये त्यांचे समर्थन करा. तुमच्या जोडीदाराला, बहिणीला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवू द्या.

हेही वाचा – चुलीनेच दिली ओळख! जेवण बनवून लोकांची प्रेरणा बनलेल्या ‘या’ मराठमोळ्या अन्नपूर्णा! कसा होता त्यांचा प्रवास

महिलांना काय सांगायचे ते शांतपणे ऐका

तुमच्या आयुष्यातील महिलांना त्या किती महत्त्वाच्या आहेत हे सांगायचे असले तर त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्या काय सांगत आहेत, ते काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला काही सांगत असेल तेव्हा तिचे शांतपणे ऐका, त्यांच्यावर स्वत:ची मते लादू नका. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपण विशेष असल्याची भावना निर्माण होते.