ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या नव्या अभ्यासानुसार, जगभरात आपल्या आरोग्य विषयक समस्यांवर उपाय आणि चर्चा इंटरनेटवर करणाऱया नेटिझन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
गेल्या दहावर्षात इंटरनेटच्या महाजालात झालेली प्रगती पाहता, इंटरनेटवर आज असंख्य नेटिझन्स आपल्या आरोग्य समस्यांवर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा इंटरनेटवर आरोग्य विषयक संकेतस्थळे आणि ऑनलाईन चॅटवरून सल्ले घेणे पसंत करु लागले आहेत. संशोधकांच्या माहितीनुसार, लहानसहान आजारांपासून घातक आजारांपर्यंत इंटरनेटवरील सल्ले पसंत करणाऱया नेटिझन्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाचली आहे. २००१ आणि २०१३ सालच्या इंटरनेटवरील आरोग्य विषयक माहिती आणि सल्ले घेणाऱयांच्या संख्येत विलक्षणीय वाढ झाली आहे. २०१३ सालापर्यंत नेटिझन्सची आरोग्यविषयक संकेतस्थळांना भेट देणे नित्यनेमाचे झाले असल्याचेही समोर आले आहे.
कामावर असताना अचानक झालेल्या आरोग्य विषयक समस्यांवर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा इंटरनेटवरच उपाय शोधून उपचारी औषधे खरेदी करण्याकडे नेटिझन्सची मानसिकता वळाली आहे.
तसेच http://www.healthtalkonline.org अशा ऑनलाईन चॅटच्या साईट्स उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य विषयक समस्यांवर मार्गदर्शन घेणाऱयांचे प्रमाणही वाढले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
इंटरनेट नव्या युगाचा डॉक्टर!
ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या नव्या अभ्यासानुसार, जगभरात आपल्या आरोग्य विषयक समस्यांवर उपाय आणि चर्चा इंटरनेटवर करणाऱया नेटिझन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

First published on: 06-03-2014 at 06:27 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internet is the gen next doctor