Home remedies for dark neck: उन्हाळ्यात घाम, धूळ आणि त्वचेच्या टॅनिंगमुळे मानेसह चेहरादेखील अनेकदा काळवंडतो. लोक चेहरा सहज स्वच्छ करतात, पण मान अनेकदा स्किनकेअर रूटीनमधून वगळली जाते, ज्यामुळे त्यावरील ही घाण आणि काळेपणा खूप वाईट दिसू लागतो. जर तुमची मान काळी झाली असेल तर तुम्ही ती सहज स्वच्छ करू शकता.

लिंबू आणि साखरेचा वापर

लिंबू आणि साखरेच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा सहज साफ करू शकता. खरे तर लिंबू नैसर्गिक ब्लॉनिंग एजेंट म्हणून काम करते. साखरेचा स्क्रब बनवून तुम्ही मानेवरील घाण आणि मृत त्वचा सहजपणे काढून टाकू शकता.

कसे वापरायचे?

लिंबू आणि साखरेचा स्क्रब बनवण्यासाठी प्रथम लिंबू कापून त्यात थोडी साखर घाला आणि मानेवरील काळ्या भागांवर गोलाकार पद्धतीने हळूवार फिरवा. काही वेळाने ते धुवा. तुम्ही आठवडयातून दोनदा ते वापरू शकता, यामुळे तुमची मान चमकदार होईल.

लिंबू आणि दह्याचा पॅक

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि दह्याचा पॅक वापरू शकता. खरंतर लिंबामध्ये असलेले लेक्टिक अॅसिड मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. ते बनवण्यासाठी एक चमचा दह्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि मानेवर व्यस्थित लावा. सुमारे १० मिनिटांनंतर हातांनी हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. लिंबू आणि दह्याचा पॅक मानेवरील घाण काढून टाकण्यास मदत करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.