आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देशातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने सुक्ष्म, लघु आणि मध्यम (MSMBs) उद्योजकांसाठी JioBusiness अंतर्गत काही नवीन ब्रॉडबँड प्लॅन आणलेत. कंपनीने लाँच केलेले नवीन प्लॅन्स Enterprise-Grade Fiber Connectivity सह येतील, शिवाय या प्लॅन्समध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय JioBusiness अंतर्गत डिजिटल सॉल्युशन देईल, त्याद्वारे मालकाला आपला व्यवसाय वाढवण्यास व हाताळण्यास मदत मिळेल. एमएसएमबी ग्राहकांना स्वस्त दरात म्हणजे मार्केट व्हॅल्यूच्या तुलनेत केवळ 10 टक्के दराने ब्रॉडबँड कनेक्शन दिलं जाईल, असा कंपनीचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रॉडबँड आणि व्हॉइस सेवेसाठी सध्या व्यावसायिकांना दर महिन्याला 9900 रुपये द्यावे लागतात. पण जिओकडून केवळ 901 रुपये आकारले जातील. यामध्ये 100 एमबीपीएस स्पीडची कनेक्टिव्हिटी (अपलोड आणि डाउनलोड इंटरनेट स्पीड ) मिळेल. यामुळे जवळपास 5 कोटी व्यावसायिकांना फायदा MSMBs होईल, असा दावाही जिओकडून करण्यात आला आहे. 901 रुपयांपासून JioBusiness प्लॅन्सची सुरूवात होते. 901 रुपयांच्या प्लॅनशिवाय कंपनीकडे 1201 रुपये, 2001 रुपये, 3001 रुपये, 5001 रुपये, 7001 रुपये आणि 10001 रुपयांचे अनेक आकर्षक प्लॅन्सही आहेत.

कसं घ्यायचं कनेक्शन? :
तुम्हालाही JioBusienss कनेक्शन घ्यायचं असल्यास प्रथम कंपनीच्या http://www.jio.com/business या संकेतस्थळावर जा. तिथे Interested सेक्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

( फोटो – https://www.jio.com/business/ )

फायदा काय? :
अन्य ऑपरेटर्स 9900 रुपयांमध्ये केवळ दरमहा कनेक्टिव्हिटी उपलब्ध करुन देतात. या तुलनेत जिओकडे 5001 रुपयांचा एक दुसरा मासिक प्लॅन आहे. यामध्ये केवळ कनेक्टिव्हिटी नव्हे (अनलिमिटेड फायबर ब्रॉडबँड आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग) तर डिजिटल सॉल्युशन्सही मिळतील. डिजिटल सॉल्युशन्सअंतर्गत माइक्रोसॉफ्ट 365 चे 10 लायसन्स, जिओ अटेंडन्सचे 20 लायसन्स, मार्केटिंगचे प्रो लायसन्स, कॉन्फरन्सिंगचे 2/10 लायसन्स मिळतील. माइक्रोसॉफ्ट 365 अंतर्गत व्यावसायिकांना ऑफिस अ‍ॅप्स, आउटलुक ई-मेल, वन ड्राइव्ह आणि टीम्सची सेवा मिळेल. जिओ अटेंडन्सअंतर्गत ऑफिसपासून दूर असतानाही आपल्या कर्मचाऱ्यांना मॅनेज करता येते. याशिवाय मार्केटिंगअंतर्गत तुमचा बिजनेस ऑनलाइन करता येईल, तर कॉन्फरन्सिंगअंतर्गत 24 तासांपर्यंत जिओमीटद्वारे सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि माइक्रोसॉफ्ट टीम्सद्वारे ग्रुप चॅटिंग व कॉन्फरन्स करता येतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio launches special jiofiber business plans for traders and companies starts from rs 901 check all pricing details sas
First published on: 11-03-2021 at 13:31 IST