आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) गेमिंग मास्टर्स ही एक ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. Jio कंपनी चिपसेट मेकिंग कंपनी MediaTek सोबत भागीदारीअंतर्गत गेमिंग टुर्नामेंट लाँच करेल. jio ची ही पहिलीच ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट असणार आहे.

१३ जानेवारी ते ७ मार्च दरम्यान म्हणजेच ७० दिवसांसाठी जिओची ही स्पर्धा असेल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १२.५० लाख रुपयांचं वाटप बक्षीस म्हणून केलं जाईल. जिओच्या JioTV HD वर या स्पर्धेचं लाइव्ह प्रक्षेपण असेल.


कसं आणि कुठे करायचं रजिस्ट्रेशन :-
या ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंटमध्ये Garena’s battle royal Game Free Fire या गेमला फिचर केलं जाईल. Free Fire हा ऑनलाइन गेम खेळण्यासाठी तुम्हाला स्वतःला रजिस्टर करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी जिओ गेम प्लॅटफॉर्मवर (JioGames ) सुरूवात झाली आहे. १० जानेवारीपर्यंत युजर्स रजिस्ट्रेशन करु शकतात. फ्री फायर गेमिंग मास्टर ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये होणार असून ग्रँड फिनालेमध्ये २४ संघ सहभागी होतील.