मागच्या काही दिवसांमध्ये रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये जणू एकप्रकारची स्पर्धा सुरु झाली आहे. जिओनेही आपल्या युजर्ससाठी काही खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. रिलायन्स जिओने स्वस्त प्लान्स बाजारात आणल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही या स्पर्धेत उतरल्या. ग्राहकांना स्वस्तात स्वस्त प्लान देण्याची जणू या कंपन्यांमध्ये स्पर्धाच लागलीये. त्यामुळे जिओने बाजारात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अनेक मोबाईल कंपन्यांना एखाद्या दुर्गम ठिकाणी गेल्यावर रेंज येत नाही. याशिवाय आपण प्रवासाला निघालो आणि फोनची बॅटरी संपत येते. अशावेळी नेमके काय करायचे ते आपल्याला माहित नसते. पण अशावेळी आपल्याला त्या फोनवर येणार फोनकॉल्स आपण दुसऱ्या क्रमांकावर ट्रान्सफर करु शकतो. जिओच्या ग्राहकांसाठी ही सुविधा अगदी सोपी आहे. त्यासाठी कंपनीने त्यांना सीक्रेट कोड दिला असून त्याव्दारे जिओचे ग्राहक आपले कॉल डायव्हर्ट करु शकतील. पाहूयात यातील टप्पे…

Health Special, Doctor,
Health Special: डॉक्टर गुगलचे फायदे अधिक की, तोटे? काय कराल? काय टाळाल?
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Here's Why You Should Never Reheat Cooking Oil
Reusing Cooking oil: एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…

१. सर्वात आधी आपल्या फोनमधील कॉलच्या मेन्यूवर या. यामध्ये *409* डायल करा. त्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला आपले कॉल ज्या क्रमांकावर डायव्हर्ट करायचे आहेत तो १० अंकी क्रमांक डायल करा.

२. हे सगळे डायल केल्यावर कॉलवर क्लिक करा. कॉल लागल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटरचा आवाज येईल. रेंजच्या बाहेर असेपर्यंत किंवा आपला पहिला फोन बंद असेपर्यंत आपले कॉल फॉर्वर्डिंग सक्रीय झाले आहे. यामुळे तुमच्या जिओच्या क्रमांकावर येणारे सगळे कॉल दुसऱ्या क्रमांकावर डायव्हर्ट होतील, तेही केवळ एका टप्प्याव्दारे.

३. आता कॉल डायव्हर्ट केले हे ठिक आहे पण ते पुन्हा डिअॅक्टीवेटही करावे लागेल. त्यासाठीही एका स्पेटमध्ये हे सगळे करता येईल. यासाठी आपल्या फोनमध्ये *410 डायल करा. यानंतर कॉम्प्युटर सिस्टीमव्दारे मोबाईल बंद किंवा आऊट ऑफ रेंज असल्याने डायव्हर्ट करण्याची सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर तुमच्या जिओच्या नंबरवर येणारे सगळे कॉल्स जिओच्याच क्रमांकावर येतील.