नखांची काळजी घेण्यासाठी, त्यांना साफ आणि सुंदर ठेवण्यासाठी नेहमीच कोणत्या महागड्या पार्लरची किंवा उत्पादनांची गरज नसते. आपली काळजी घेण्यासाठी निसर्ग कायमच आपली मदत करत असतो. पण, घरात नेहमी दिसणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर आपण आपल्या नखांसाठी कसा करू शकतो, हे माहीत असायला हवं.

चला मग अशा १० नैसर्गिक गोष्टींनी आपल्या नखांची काळजी घेऊन त्यांना सुंदर दिसण्यासाठी मदत करू.

Things to Know about Mouthwash
तोंडातील दुर्गंधीपासूनच्या सुटकेसाठी तुम्हीही रोज माउथवॉश वापरताय? पण डाॅक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Fresh vs pre-shaved coconut water
ताजे की पॅकबंद? कोणते नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Can precum during sex cause pregnancy Birth Control Options
पूर्वस्खलनामुळे गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? संभोग पूर्ण न होताही प्रेग्नन्ट होऊ शकता का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Desi Ghee vs Butter What is Better Simple Chart of fats calories
तूप खावं की बटर? दोन्हीच्या पोषणाची आकडे सांगणारा ‘हा’ तक्ता पाहा, तूप कसं बनवायचं व का खायचं याचं उत्तरही वाचा
fake ORS and health risk
तुम्ही ‘बनावटी’ ORS तर पीत नाही ना? ‘शारीरिक त्रास ते मेंदूला सूज’, होऊ शकतात गंभीर समस्या! डॉक्टरांचा सल्ला पाहा
Women Health, Thyroid, Weight Gain,
स्त्री आरोग्य : थायरॉइडच्या समस्येमुळे वजन वाढतं का?
diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin
Skin Care : स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ पदार्थ चुकूनही चेहऱ्यावर लावू नका; अन्यथा…
Health Special, Doctor,
Health Special: डॉक्टर गुगलचे फायदे अधिक की, तोटे? काय कराल? काय टाळाल?

नखांच्या आरोग्यासाठी १० टिप्स :

१. सकस आहार

आहारामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असणे, नखांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात. आहारात ज्यांमध्ये प्रथिने, ई जीवनसत्व, जास्त प्रमाणात असतात अश्या पदार्थांचे सेवन करा. अंडी, शेंगदाणे, संपूर्णधान्य, पालक, सूर्यफुलाच्या बिया, बदाम, मासे यांसारखे पदार्थ नखांच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

२. पाणी पिणे

शरीराला हायड्रेट ठेवणे हे नखांसाठी अत्यंत महत्वाचे असते. पाणी योग्य प्रमाण प्यायल्याने, नखं कोरडी पडत नाहीत; तुटत नाहीत.

३. खोबरेल तेल

खोबरेल तरल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. हे तेल नखांमधील मऊपणा टिकवून ठेऊन नखं मजबूत ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपण्यापूर्वी, नखांना काही थेंब खोबरेल तेलाचे लावून ठेवल्यास, ते नखांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा : पालक वापरून बनवा चविष्ट डोसा; तांदळाऐवजी ‘हे’ धान्य वापरून होतील पौष्टिक; रेसिपी पाहा….

४. लिंबाचा रस

लिंबाच्या रसाने नखं चमकदार होण्यास मदत होते. लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात मिसळून त्या मिश्रणात नखं काही मिनिटे बुडवून ठेवल्याने, नखांची मजबूती टिकून राहते.

५. ई जीवनसत्व

व्हिटॅमिन ई ऑइल तुमच्या नखांचा मऊपणा कायम ठेऊन त्यांच्या वाढीसाठी मदत करते. नखांची वाढ होण्यासाठी हे तेल तुम्ही तुमच्या नखांवर लावू शकता. किंवा ज्या उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन ई तेल असेल अशा, गोष्टींचा वापर करू शकता.

६. टी ट्री ऑइल [tea tree oil]

टी ट्री ऑईलमध्ये असलेल्या घटकांमुळे हे तेल नखांना होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. याचा वापर करण्यासाठी हे टी ट्री तेल, खोबरेल तरल किंवा इतर कुठल्या तेलात मिसळून तुमच्या नखांवर लावा.

७. हॉर्सटेलचा अर्क [horsetail extract]

हॉर्सटेल मध्ये नखांच्या मजबुतीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक असणारे सिलिका हे खनिज भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नखांच्या वाढीसाठी ज्या उत्पादनांमध्ये हॉर्सटेल अर्क असेल त्या गोष्टी वापरू शकता.

८. ऑलिव्ह तेल

कोमट ऑलिव्ह तेलामध्ये आपली नखं बुडवल्याने नखं मॉईशचराईझ्ड होण्यास मदत होते.

९. बोटीन [एच जीवनसत्व]

बोटीनदेखील तुमच्या नखांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी उपयुक्त असते. परंतु याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच उपयोग करा.

१०. लसूण

जेवणानंतर हाताला येणाऱ्या लसणाचा वास जरी आवडत नसला तरीही, लसूण तुमच्या नखांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या घेऊन त्यांना व्यवस्थित ठेचा आणि खोबरेल तेलासारख्या, कोणत्याही तेलात मिसळून आपल्या नखांवर १० मिनिटांसाठी लावून ठेवून नंतर धुवून टाका.

नैसर्गिक गोष्टींचा वापर करत असतांना त्याचा उपयोग होण्यासाठी, उपाय करतांना त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे असते.

महत्वाची सूचना : नखांची काळजी घेण्यासाठी, नैसर्गिक गोष्टींचा वापर करतांना तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा त्रास किंवा ॲलर्जी असल्यास त्याचा वापर टाळावा; अथवा वापर करताना विशेष काळजी घ्यावी. कोणताही उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याने त्रास होत असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे किंवा त्वचातज्ज्ञांकडे जावे. त्यांच्या सल्ल्याने तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य असू शकतात याचा सल्ला घ्यावा.