याच वर्षी भारतात पदार्पण करणारी दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी Kia Motors बाबत चांगलंच क्रेझ असल्याचं दिसतंय. ऑक्टोबर महिन्यातील विक्रीच्या मार्केट शेअरमध्ये टॉप 10 कार्सच्या यादीत किया मोटर्सने सातवं स्थान मिळवलंय. ‘सेल्टॉस’च्या बळावर लाँच झाल्यापासून तीन महिन्यांमध्येच कंपनीने अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकलंय. एकीकडे देशात ऑटोमोबाइल क्षेत्रात मंदी असताना किया मोटर्सने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या भारतीय बाजारात केवळ सेल्टोस ही किया मोटर्सची एकमेव कार आहे. ऑक्टोबरमध्ये एकूण 12,854 सेल्टॉसची विक्री झाली आहे. सेल्टॉसची क्रेझ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण, यापूर्वीच कंपनीला जवळपास 60,000 सेल्टॉसची बुकिंग मिळाली आहे. यातील 26 हजार 640 गाड्यांची लवकरच डिलिव्हरीही केली जाणार आहे. किया मोटर्सशिवाय भारतीय बाजारात पदार्पण करणाऱ्या MG Motors ने देखील दमदार प्रदर्शन केलंय. ऑक्टोबरमध्ये 3,536 हेक्टर विकल्या गेल्यात. सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीच्या Dzire ने आपला दबदबा कायम ठेवला असून अव्वल क्रमांक गाठलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kia motors seltos craze in indian market october month sales record sas
First published on: 07-11-2019 at 11:13 IST